प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

Welcome.

इसी तरह की प्रस्तुतियाँ


विषय पर प्रस्तुति: "Welcome."— प्रस्तुति प्रतिलेख:

1 Welcome

2 मार्गदर्शक:- प्रा.कोळेकर एस. एस.
रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हड़पसर, पुणे-28 कॉमर्स विभाग एस वाय बी. कॉम मार्गदर्शक:- प्रा.कोळेकर एस. एस.

3 भारतातील सद्य:विपणन पर्यावरण current marketing environment in India

4 *विपणन पर्यावरण* प्रस्तावना-
लोक राहतात ती परिस्थिती किंवा त्यांच्या सभोवतालची परिस्थितीयाला पर्यावरण असे म्हणतात. याचाच अर्थ, आजूबाजूचा परिसर किंवा सर्वकष वातावरण (केवळ भौगोलिक वा हवामानदृष्ट्या वातावरण नव्हे तर सर्वकष वातावरण .)यालाही पर्यावरण असे म्हणतात. तसेच विपणन पर्यावरण म्हणजे अशा आर्थिक, सामाजिक, शासकीय,राजकीय,पुरवठादार,भौगोलिक,तांत्रिक घटकांचा समावेश होतो,कि जे व्यवसायाच्या येणारे धोके व संधी निर्धारित करतात.

5 *विपणन पर्यावरण* अर्थ-
“आपण सर्व जण एका पर्यावरणात जगत व वाढत असतो. व्यवसाय संस्थाही एका पर्यावरणात वाढतेवजगते.विपणन कृतीही या पर्यावरणाचा एक भाग असतात.एकूण सर्वसमावेशक पर्यावरणाचा ‘विपणन पर्यावरण ‘म्हणतात” .विपणन पर्यावरणात समाजातील घटकांचा समावेश होतो.विपणन पर्यावरणाचे दोन प्रकार आहे. १) अंतर्गत पर्यावरण आणि २)बहिर्गत पर्यावरण .अंतर्गत पर्यावरणाचा व्यवसायावर मोठा परिणाम होतो..तसेच बहिर्गत पर्यावरणात राजकीय ,सामाजिक,आर्थिक इ.या घटकांचा समावेश होतो

6 *विपणन पर्यावरण* व्याख्या-
“ ज्या विविध शक्तींच्या साहाय्यने वा ज्या विविध घटकांच्या नियंत्रणाखाली विपणन कृती पूर्णत्वास नेल्या जातात ,त्या सर्वाचे मिळून विपणन पर्यावरण बनते.थोडक्यात ,विपनानाच्या आजूबाजूचे व सभोवतालचे सर्व घटक मिळून जे संमिश्रण तयार होते ते दृश्य-अदृश्य संमिश्रण म्हणजेच ‘विपणन पर्यावरण ‘होय.”

7 विपणन पर्यावरणाचे अंतर्गत व बाह्य घटक :-
आर्थिक/सामाजिक/राजकीय /कायदेशीर/तंत्रज्ञानविषयक कामगार-व्यवस्थापन संबंध,उत्पाकता,दर्जा व्यवस्थापण संस्थेची धोरणे व मुल्यव्यवस्था कर्मचाऱ्यांचे मनोबल व निष्ठा अंतर्गत घटक उत्पादन सामग्री,वित्तीय व मनुष्यबळ सामग्री सांस्कृतिक/ग्राहक वर्तन/आंतराष्ट्रीय स्थिती/भौगोलिक वातावरण

8 * विपणन पर्यावरणाचे प्रकार*
अंतर्गत पर्यावरण- अंतर्गत पर्यावरणातील घटक :- 1)कामगार-व्यवस्थापन संबंध – कामगार -व्यवस्थापन संबंध उत्तम ठेवणे हे व्यवस्थापनाला शक्य असते .विक्रेत्याचा संच विपणन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे नातेसंबंध यांचाशी निगडीत बाबी हाताळणे व्यवस्थापनाला शक्य असते . २)उत्पादकता :- व्यवसाय संस्थेत योग्य व्यवस्थापन करुन जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी वस्तू व सेवाची उत्पादकता उंचावण्यासाठी प्रयत्न व्यवस्थापन करू शकतो

9 * विपणन पर्यावरणाचे प्रकार*
३)दर्जा व्यवस्थापन व दर्जा निष्टा :- दर्जा व्यवस्थापन राबून चांगले दर्जेदार विपणन प्रयत्न करणे हे व्यवस्थापनाच्या दर्जा-निष्ठा व दर्जाविषय धोरणावरच अवलंबून असते . ४)संस्थेची समग्र धोरणे :- व्यवस्थापनाद्वारे संस्थेची विविध धोरणे आखली जातात ,व या धोरणद्वारे निश्चित उद्दिष्ट साध्य केले जाते .समग्र पातळीवर या धोरणाचा अभ्यास केला जातो .म्हणजेच संस्थेची धोरणे हि समग्र असतात .

10 * विपणन पर्यावरणाचे प्रकार*
५)मूल्यव्यवस्था :- संघटनेची वर्षानुवर्षे एक परंपरा असते व त्या परंपरेतून मुल्यरचना व मूल्यव्यवस्था जन्माला आलेली असते व्यवस्थापनाद्वारे व्यवसायात उत्पादित मालाचे मूल्य निश्चित केले जाते ६)उत्पादन सामग्री :- व्याव्स्थाप्नाद्यारे व्यवसाय संस्थेस आवश्यक कचा माल उपलब्ध करुन दिला जातो .या कच्या मालाचा वापर उत्पादनाची निर्मिती केली जाते .

11 बहिर्गत पर्यावरण:- १)आर्थिक घटक :-
विपणन पर्यावरणाचा ‘आर्थिक घटक ‘हा महत्वाचा घटक भाग आहे. उत्तम आर्थिक स्थिती हि उत्तम विपणन पर्यावरण जन्मास घालू शकते .बाजारातील व्याजाचे दर,नाणे पुरवठा किमतपातली ,ग्राहकपत (customer credit) इ.बाबी विपणन पर्यावरणावर सरळ परिणाम करीत असतात.स्थावर मालमतेचा बाजार आणि गृहपयोगी वस्तूचा बाजार यांचावर उच्च व्याजदारचा वाईट परिणाम होत असतो.मंदीचा काळात वस्तू नियोजन,किंमत निश्चिती आणि विक्रय वृद्धी धोरणे यावर नकारात्मक परिणाम होत असतात.चलनवाढीचा वेगाचाही विपणन पर्यावरणावर थेट परिणाम होत असतो.

12 बहिर्गत पर्यावरण:- २)राजकीय घटक :-
विपणन पर्यावरण हे व्यवसाय संस्थांच्या विविध कृती मधून सिद्ध होत जाते .व्यवसाय संस्था कार्यरत असलेल्या समाजातील राजकीय व कायदा शक्ति केंद्रे (political and legal forces)व्यवसायाचा पर्यावरणावर व पर्यायाने विपणन पर्यावरणावर परिणाम करतात.विपणन पर्यावरण हे सरकारच्या आयात –निर्यात धोरण,कर पद्धती,जकात,सीमा शुल्क,सार्वजनिक वाहतूक व वितरण व्यवस्था,वितीय धोरणे यांच्या ठायी संवेदनशील असते.एवढेच नाही तर विपणन पर्यावरणा च्या भौतिक बाजूही कायद्याने नियंत्रित केलेल्या असतात.

13 बहिर्गत पर्यावरण:- ३)सामाजिक घटक :-
खरेतर सांस्कृतिक घटक हे सामाजिक पर्यावरणाचे घटक असतात. परंतु आपण त्याचा स्वतंत्र पणे विचार करणार आहोत.समाज हा मनुष्य प्राण्याच्या समुहापासून बनतो.म्हणूनच मानवी वैशिष्ट्यांनी सामाजिक पर्यावरण बनत असते.जनसंख्या वैशिष्ठे (demographic features) आणि भौगोलिक वैशिष्ठे (geographical locational features) हे सामाजिक पर्यावरणाचे महत्वाचे भाग आहेत.

14 बहिर्गत पर्यावरण 4) सांस्कृतिक घटक :-
समाजाच्या श्रद्धा ,मुल्ये व चांगल्या वाईटपणाचे निकष (norms) हे रूढी,परंपरा व वर्षानुवर्षाच्या आचरणातून निश्चित झालेले असतात.या सर्वामुळे समाजाला एक प्रतिमा प्राप्त झालेली असते.लोकांचे निसर्गाशी विश्वाशी ,इतरांशी व स्वताचे स्वताशी नाते संबंध कसे आहेत हे अबोध पातळीवर (Unconsciously)हळूहळू निश्चित होत गेलेले दिसते.इतकेच नाही,तर विविध संस्कृतीचे लोक एकच वस्तू विविध प्रकारे वापरता असतात.त्या वस्तूकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन,उपयोगाचे हेतू ,वस्तू उपयोगाची स्थिती यामध्येही बदल होत असतात. समाजातील सर्व घटकांचा विचार विपणनकर्त्यास करावा लागतो.

15 बहिर्गत पर्यावरण ५)तंत्रज्ञान विषयक घटक :-
सध्याचे युग हे ज्ञानाचे प्रस्फोटाचे युग(Age of knowledge explosion) मानले जाते.मानवी प्रतिभेच्या बहरामुळे नवे शोध लागून तंत्र वैज्ञानिक पर्यावरण अत्यंत वेगाने बदलत चालले आहे .संगणक हे त्यांचे उत्तम उदाहरण होय.ए खाद्या वस्तूच्या जीवनक्रमात (product life) तांत्रिक बदलामुळे प्रचंड बदल होऊ लागले आहेत.काही वस्तू वा सेवाबाबत तांत्रिक पर्य्वर्ण प्रचंड वेगाने बदलत आहे.शात्रीय प्रगतीचा व शोधाचा हा परिणाम आहे .त्यामुळे केवळ उत्पादन तंत्रच बदलले नसून विपणन तंत्रही वेगाने बदलत आहे.

16 बहिर्गत पर्यावरण ६)परिस्थिती विषयक घटक :-
व्यवसायाची सामाजिक जबाबदारी असते कि ,समाजाचे शोषण न करता व्यवसाय चालू राहिला पाहिजे व्यावसायिक कृतीची एक सामाजिक किमत असते व समाजाचे जैव भौतिक घटक त्यातून विस्कळीत होऊ नयेत अशी अपेक्षा असते.हवा /वायू ,ध्वनी व जल प्रदूषण टाळणे हि विपणन कर्त्याची जबाबदारी असते .समाजाच्या सुरक्षिततेला व आरोग्याला धोका पोहोचणार नाही याची विपणन कर्त्यास काळजी घ्यावी लागते .उदा .ताजमहाल ,या भारताच्या सांस्कृतिक ठेव्यावर आजूबाजूच्या उद्योगांचा परिणाम होऊ लागल्याने थेट सर्वोच न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला होता

17 Thank you


डाउनलोड ppt "Welcome."

इसी तरह की प्रस्तुतियाँ


गूगल के विज्ञापन