प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

Welcome.

इसी तरह की प्रस्तुतियाँ


विषय पर प्रस्तुति: "Welcome."— प्रस्तुति प्रतिलेख:

1 welcome

2 रयत शिक्षण संस्थेचे एस.एम.जोशी कॉलेज, हडपसर,पुणे-२८ कॉमर्स विभाग
रयत शिक्षण संस्थेचे एस.एम.जोशी कॉलेज, हडपसर,पुणे-२८ कॉमर्स विभाग

3 प्रा.कोळेकर एस.एस. मार्गदर्शक शैक्षणिक वर्ष :२०१७ -१८
शैक्षणिक वर्ष :२०१७ -१८ पैसे पाठविण्याच्या पध्दती (Methods of Remittances)

4 प्रस्तावना :- प्रतिनिधी कार्याचा भाग म्हणून किंवा ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून बँकेला एका स्थळाहून अन्य स्थळी पैशाच्या निधिच्या पाठवणीची व्यवस्था कररावी लागते. हे काम बँक ग्राहकाच्या वतीने करते. अशा परिस्थितीत ग्राहकाच्या वतीने बँक पैशाचे स्थलांतर करण्याची जबाबदारी घेते तेव्हा बँक कमी खर्चात सेवा देण्याचीच हमी देत तर सेवा सुरक्षितपणे व तत्परतेने देण्याची हमीही देते. आपण पैशाची पाठवणी करण्याच्या सार्वत्रिक पद्धती या प्रकरणात पाहणार आहोत.

5 मागणी धनाकर्ष ( Demand drafts)
मागणी धनाकर्ष म्हणजे असा धनादेश कि, जो एकाच बँकेच्या एका शाखेने दुसर्‍या शाखेवर काढलेला असतो. धनाकर्षात ज्या शाखेकडून पैसे मिळवावयाचे असतात त्या शाखेचे नाव ( drawee branch) निर्देशित केले जाते. मागणी धनाकर्ष फार कमी खर्चीक असल्याने पैशाच्या मोठ्या रकमेची पाठवणणी करणणे सुलभ आहे. मागणी धनाकर्ष रेखांकित असल्याने पैशाचे स्थलांतरण करण्याची ही फार सुरक्षित पध्दती आहे.

6 धनादेश :- बँकेचा धनादेश / प्रधान आदेश :-
आंतरबँक व्यवहारात प्रदान आदेशांचे स्थान महत्वाचे असते. प्रदान आदेश हा मागणी अधिकर्षासारखाच असतो. फक्त तो बँकेने आपल्या शाखेवर काढलेला असतो. उदाहरणार्थ:- एखाद्या बँकेच्या शिवाजीनगर शाखेत ‘क’ चे खाते आहे. ‘क’ ला आपल्या खात्यातुन ₹ ५०००० ‘ख’ ला द्यावयाचे आहेत.अशा वेळी आपल्या धनादेश-पुस्तकातुन ₹ ५०००० चा धनादेश लिहुन तो ‘ख’ ला देता येईल.

7 ट्रंकेटेड चेक :- धननादेश लिहीणार्‍या व्यक्तीने ज्याला तो दिला जातो ती व्यक्ती आपल्या खात्यात तो चेक भरते.ती बँक तो धनादेश मूर्त (physical) स्वरुपात वसुलीसाठी ज्या बँकेचा तो धनादेश असेल त्या बँकेकडे पाठवित असे.आता प्रत्यक्ष कागदी स्वरुपात तो पाठविण्याऐवजी त्या धनादेशाची प्रतिमा पाठविणे शक्य असल्याने नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करुन,झटपट समाशोधन (clearing) करणे शक्य आहे. याला ‘द्रुत समाशोधन धनादेश’ म्हणतात.

8 टपाल प्रेषण व तार प्रेषण :-
टपाल प्रेषण (mail transfer) :- एकाच पत्रावर,अनेक प्रेषणांचे संज्ञापन (communication) केले जात असल्याने प्रत्येक प्रेषणास बँकेस येणारा खर्च क्षुल्लक असतो. बँका त्यांच्या ग्राहकांना निधीच्या पाठवणीच्या स्वस्त पध्दतीची तरतूद करतात. टपाल प्रेषणास प्रत्यक्ष पत संलेखाचे टपाल पाठविण्याची(post of a credit instrument) गरज नसते. उदाहरणार्थ :- धनादेश,धनाकर्ष, त्यामुळे अपहार होण्याचे धोके यात नसतात. म्हणून हि प्रेषण पध्दती अति सुरक्षित असते.

9 तार प्रेषण (telegraphic transfer) :-
टपाल प्रेषणाऐवजी एखादी व्यक्ती तार प्रेषणाने पैसे पाठवू शकते. अशा प्रेषणाचा विशेष फायदा म्हणजे प्रेषणाचा जलदपणा होय. साट्टेबाजी करणारे,शेअर- ब्रोकर्स इत्यादिंना हि सुविधा फार महत्वाची आहे सामान्य लोकांना अनेक वेळा अनपेक्षित अशा परदेश प्रवासासाठी अगर आकस्मिट आजारासाठी तात्काळ पैशाचे प्रेषण करण्याची गरज पडते.तेव्हा ही पध्दती अउपयुक्त ठरते. फॅक्सची (fax) अगदी अलीकडची सुविधा ही सर्व अडचणींवर मात करणारी आहे ; परंतु तिला फार मोठा खर्च येतो.

10 इलेक्टानिक निधी संक्रमण :
इलेक्टानिक माध्यमातून निधी संक्रमण (electronic funds transfer) सर्वकाल स्थुल समाशोधन सेवा (real time gross settlement –RTGS) राष्टीय इलेक्टोनिक निधी संक्रमन (national electronic funds transfer –NEFT) जगदव्यापी आंतरबँक वित्तीय दुरसंपर्क संघटना /स्विफ्ट (the society for the worldwide inter-bank financial telecommunication –SWIFT)

11 पैसे पाठविण्याच्या इतर पध्दती (other methods of remittances)
प्रवासी धनादेश (traveller’s cheque):- प्रवासी धनादेशाची वहनीयता सुलभ असते; कारण फार मोठ्या मूल्यांचे कमी संख्येचे धनादेश फार मोठ्या प्रमाणावरील रक्कम समाविष्ट करतात. या धनादेशांची चोरी होणे शक्य नसते कारण असे धनादेश निर्देशित केलेल्या व्यक्तींशिवाय धारक व्यक्तींकडून नष्ट केले जाणे शक्य नाही. जर प्रवासी धनादेश हरवला तर धनादेश सापडणार्‍या व्यक्तीला पैसे मिळणे कठीण असते क्षतिपूर्ती बंधपत्र (indemnity bond) सादर केल्यावर धनादेशाच्या खर्‍या मालकास धनदेशाची रक्कम परत केली जाते.

12 आहेर धनादेश (gift cheque):-
काटेकोरपणे बोलायचे तर आहेर धनादेश हा पैसे पाठविण्याच्या पध्दतीचा प्रकार नसून बँकेने पुरविलेली ती एक लोकोपयोगी सेवा आहे तथापि, स्थानिक अथवा बाहेरगावाच्या व्यक्तीला आहेर धनादेश देऊन पैशाचे हस्तांतरञ करता येत असल्यामुळे तो पैसे पाठवण्याचा अथवा संक्रमणाचा एक प्रकार मानता येतो. आहेर धनादेशाचा उद्देश विशेष प्रसंगी विशिष्ट व्यक्तीला आहेर करणे हा असतो. असा धनादेश कोणीही व्यक्ती बँकेकडुन घेऊ शकते.

13 प्रवासी कर्जपत्र (traveller’s letter of credit):-
प्रवासी कर्जपत्र:- हे जणू काही देणार्‍या एतदेशीय बँकेला विनंतीवजा पत्रच असते या पत्राव्दारे एतदेशीय बँक,विदेशी बँक किंवा तिच्या अधिकृत एजंटसना प्रवाशाच्या नावाने काढलेल्या हुंड्या किंवा ड्राफ्टस तात्काळ वटविण्याची विनंती करते. हमी कर्जपत्रे:- या प्रकारात विदेशी बँक कर्जपत्राचे पैसे रोख न देता दुसरे हमीपत्र देते. या हमीपत्राप्रमाणे विदेशी बँक जणू काही एतदेशीय बँकेच्या हमीपत्राला पुन्हा एकदा मी देते.या पत्राप्रमाणे विदेशी बँक आपण एतदेशीय बँकेची कर्जपत्र जर गरज पडली तर ठरावीक व्याजदराने विदेशी हुंडणामळीमध्ये पैसे परत देण्याची हमी देते.

14 Thank you


डाउनलोड ppt "Welcome."

इसी तरह की प्रस्तुतियाँ


गूगल के विज्ञापन