शोधनिबंध लेखन vnpatkar2004@yahoo.co.in शोधनिबंध लेखन vnpatkar2004@yahoo.co.in (www.scienceteacherscongress.org)
शोधनिबंधाचा आराखडा शीर्षक लेखक आणि पत्ता सारांश प्रमूख शोधशब्द प्रास्ताविक आणि लेखाचे उद्देश स्पष्टपणे मांडलेला प्रश्न आणि त्याचे उप-प्रश्न संदर्भांचे संक्षिप्त विवेचन निवडलेली संशोधन पद्धत आधारसामग्री मिळवल्याचे विवरण विश्लेषण आणि चर्चा (तक्ते, आलेख आणि आकृत्या) शिफारसी (ऐच्छिक) निष्कर्ष आभार प्रदर्शन (ऐच्छिक) परिभाषा (ऐच्छिक) वापरलेले संदर्भ परिशिष्ट (ऐच्छिक)
शोधलेखन शीर्षक - आकर्षक पण योग्य असावे (१२-१४ शब्दांत) शीर्षक - आकर्षक पण योग्य असावे (१२-१४ शब्दांत) सारांश (१५०-२०० शब्दांत; एक परिच्छेद, भूतकाळात, स्वयंपूर्ण) [उद्देश, संशोधन पध्दत, नाविन्य, कामाचा प्रकार (सैद्धांतिक, प्रयोग-आधारीत), निष्कर्ष, व्यावहारिक उपयुक्तता] प्रमूख किंवा कळीचे शोधशब्द (६ ते ८ शब्द जे मुख्य विषय, विशिष्ट प्रश्न, लेखाचा गाभा, नवी वापरलेली पद्धत आणि अभ्यासाचे स्थान वा वातावरण दर्शवतात) शीर्षक, सारांश आणि कळीचे शब्द लेख पूर्ण झाल्यावर ठरवावेत.
शोधलेखन (२) प्रास्ताविक संशोधन पद्धत - समस्या किंवा प्रश्नाचे महत्व - समस्या किंवा प्रश्नाचे महत्व - सध्या त्याबाबत काय माहीत नाही - लेखाचे उद्दिष्ट आणि व्याप्ती - लेखाचा आराखडा (अंतिम परिच्छेदात असावा) संशोधन पद्धत - अभ्यासाची चौकट आणि मुख्य चल / घटक - नमुना निवड पद्धत - प्रयोगाचा तपशील (लागू असल्यास) - आधारसामग्री / माहिती विश्लेषणाची पद्धत
प्रयोग पद्धत : पर्याय १ :- कृती पर्याय २ :- कृती पर्याय ३ :- कृती नियंत्रण गट प्रायोगिक गट पर्याय १ :- कृती उपरांत तपासणी परिणाम पर्याय २ :- कृती पूर्व तपासणी परिणाम उपरांत तपासणी पूर्व तपासणी पूर्व तपासणी पर्याय ३ :- कृती परिणाम उपरांत तपासणी उपरांत तपासणी पर्याय ४ :- कृती पूर्व तपासणी उपरांत तपासणी परिणाम कृती पूर्व तपासणी उपरांत तपासणी परिणाम
सांख्यिकी विश्लेषण पद्धत : परिणाम तपासणी पद्धत : चाचणी परिक्षा प्रश्नावली मुलाखत निरीक्षण सांख्यिकी विश्लेषण पद्धत : तक्ते व आलेख ‘टी’ टेस्ट ‘झेड’ टेस्ट ‘काय स्क्वेअर’ टेस्ट Critical Value Critical Value
शोधलेखन (३) निष्कर्ष चर्चा संदर्भ पुस्तके, शोधलेख आणि संकेतस्थळे - विश्लेषणावर भाष्य - प्रमुख परिणाम - अन्य परिणाम आणि निरीक्षणे चर्चा - कृती-प्राप्त आणि उपलब्ध (संदर्भांतून) निकालांची तुलना - निष्कर्ष-निर्देशित धोरणे आणि उपयोजन यांचे मार्गदर्शन - प्रयोग-दक्षता, अभ्यासाच्या मर्यादा आणि पुढील दिशा संदर्भ पुस्तके, शोधलेख आणि संकेतस्थळे
शोधलेखन (४) लेख विभाग व उपविभागांत मांडावा आणि त्यांना उपयुक्त शीर्षक आणि क्रमांक द्यावेत वाक्ये छोटी आणि सुटसुटीत असावीत केवळ आवश्यक संदर्भांचे विवेचन करावे प्राप्त झालेले परिणाम कां बरोबर आहेत आणि त्यांची पुष्टी कशी केली याबात माहिती द्यावी माहिती किंवा कुठल्याही बाबतीत पुनरोक्ती टाळावी संदर्भांचा निर्देश लेखात योग्य ठिकाणी असावा लेखात केवळ प्रक्रिया केलेली माहिती असावी ज्यांची कामात आणि लेखनात थेट मदत झाली तसेच अज्ञात समीक्षकांचे आभार मानणे गैर नसते
वाक्य रचना वाक्य समजणे : प्रथमपुरुषी एकवचन वापरू नये (मी, मला) - ८ शब्दांपर्यंत — अगदी सहजपणे (९०%) - ११ शब्द — सामान्यपणे (७५%) - १७ शब्द — प्रमाणितपणे (४०%) - २१ शब्द — सामान्यपणे कठीण (२४%) - २५ शब्द — कठीण (१४%) - २९ शब्दांहून अधिक — दुर्बोध (४.५%) प्रथमपुरुषी एकवचन वापरू नये (मी, मला) कृतीबाबतचे विवरण भूतकाळात, तर चर्चा आणि निष्कर्ष वर्तमानकाळात असावे
शोधलेखन (५) शोधनिबंधांची लांबी सहसा २,००० शब्द, तर शोधलेखाची लांबी ५,००० शब्द असावी (संदर्भांसहीत) संदर्भ कसे मांडावेत याबाबत सूचना पाळाव्यात (दिल्या असल्यास) लेख कुठल्या प्रकारचा असावा, तो कसा रचलेला असावा आणि तो कसा पाठवावा याबाबत दिलेल्या सर्व संपादकीय सूचना काटेकोरपणे पाळाव्यात लेखाचा दर्जा आणि जाणकारांचे मत विचारात घेऊन प्रसिद्धीसाठी नियतकालिकाची निवड करावी (सुरवातीस अति उच्च स्तरावरील नियतकालिकं निवडू नये कारण त्यांची निवड प्रक्रिया कठोर असून ८०% हून अधिक लेख अस्वीकृत होतात)
तक्ता मांडणी तक्ता ६.५ : अबकड जिल्ह्यात १९६१-२०११ दरम्यान रोजगारांत झालेले बदल (हजारांत) क्र. वर्ष शेती मत्स्योद्योग खाणकाम उद्दयोग वित्त सेवा (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ १९६१ २५० १३२ ५६ १६७ ३२ १४३ २ १९७१ १७५ ५४ ३२* ३२४ ७६ ३०० ३ १९८१ .. ….. .. ….. …. ….. ….. ….. . …. …… .. .….. …… …… ……. …… * अंदाजित स्त्रोत : भारतीय जनगणनांचे विविध वर्षातील अहवाल
आकृती मांडणी दारिद्र्य रेषा संकलित % मासिक उत्पन्न (रू.) १०० ९० ८० % शहरी कुटुंब ७० % ग्रामीण कुटुंब ६० संकलित % ५० ४० ३० २० १० ० ० ५०० ७५० १,००० १,५०० २,५०० ५,००० ६,००० मासिक उत्पन्न (रू.) आकृती ६.३ : मुंबई महानगर प्रदेशात कुटुंबाचे मासिक उत्पन्न (१९९१)
संदर्भ मांडणीच्या पद्धती निबंधात वापरलेले संदर्भ असे असू शकतात : १) पुस्तके २) नियतकालिकांतील लेख ३) अहवाल/पुस्तिका ४) अंकीय स्त्रोत जसे की संकेतस्थळे लेख किंवा निबंधाच्या शेवटी असे संदर्भ मांडण्यासाठी विविध प्रमाणित पद्धती विकसित केल्या गेल्या आहेत. त्यापैकी एक, किंवा सांगितलेली पद्धतच वापरावी.
प्रमुख संदर्भ पद्धती अमेरिकन सायकॉलॉजी असोसिएशन (एपीए) [पहा : www.apastyle.org] शिकागो मॅन्युअल ऑफ स्टार्इल (शिकागो स्टार्इल) [पहा : www.chicagomanualofstyle.org] मॉडर्न लँग्वेज असोसिएशन ऑफ अमेरिका (एमएलए) [पहा : www.mla.org/style] काही विषयांनी स्वत: च्या संदर्भ पद्धती ठरवल्या आहेत (उदा. भौतिकशास्त्र आणि संगणक विज्ञान)
निवडक मार्गदर्शक सूचना लेखाच्या शीर्षकात योग्य ठरतील असे सर्व संभाव्य शब्द लिहा आणि त्यांची विविध संमिश्रणे करुन तपासा. पर्यायवाची शब्दकोश वापरून त्यांना अधिक चपखल बनवा. जाणकारांशी चर्चा करुन त्यातील सर्वात समर्पक आणि कानाला मधुर वाटेल असे शीर्षक लेखासाठी निवडा. निबंधात आपण काय नवीन मांडत आहोत ते व्यवस्थितपणे सादर झाले आहे का हे तपासा. सर्व परिच्छेदांमध्ये जोडणी आणि वाचनात लय आहे हे बघा. मुबलक आकृत्या देण्याच्या प्रयत्न करा. अनुभवी जाणकारांचे लेखावर मत घ्या आणि अंतिम मसुदा दोन आठवडे गेल्यावर पुन्हा वाचा आणि निर्णय घ्या.
आपली संशोधन पातळी स्वत: वाढवणे
स्तुति मिळाल्यास ती कोण करतोय ते बघा, मात्र टीका मिळाल्यास ती काय आहे एव्हढेच बघा डॉ. विवेक पाटकर vnpatkar2004@yahoo.co.in (www.scienceteacherscongress.org)