WEL-COME
एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे – २८ रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे – २८ वाणिज्य विभाग एफ. वाय. बी.कॉम
प्रा. कोळेकर एस.एस. शैक्षणिक वर्ष २०१८ -१९ प्रा. कोळेकर एस.एस. शैक्षणिक वर्ष २०१८ -१९
विषय बँकव्यवसायाची मूलतत्त्वे (बँकव्यवसाय व वित्तपुरवठा )
प्रकरण: 2 रे व्यापारी बँकेची कार्ये
प्राथमिक कार्ये. 1. ठेवी स्वीकारणे. 2 प्राथमिक कार्ये 1. ठेवी स्वीकारणे 2. कर्जे आणि अग्रिमे देणे दुय्यम कार्ये 1. अभिकर्ता किंवा प्रतिनिधी कार्ये 2. सर्वसामान्य लोकपयोगी सेवा
प्रास्ताविक बँकांच्या कार्यात्मक वर्गीकरणाचा अभ्यास करताना व्यापारी बँकांचा एक स्वतंञ्य वर्ग असतो असे पाहिले. व्यापारी बँकांच्या कार्याची सुरवात खूपच पुर्वी झालेली आहे. सध्याही या बँकांनी बँकव्यवहारापैकी फार मोठा भाग व्यापलेला दिसतो. या बँका प्रामुख्याने ठेवींवर व्यवहार करणार्या बँका असतात. बँकांचे भांडवल हे ठेवीमधूनच साठवलेले असते. या बँकांचे व्यवस्थापन मात्र सर्वत्र एकाच प्रकारचे असते असे नाही. स्वत:च्या सोईप्रमाणे कोणतेही व्यवस्थापन स्वीकारतात. सहसा या बँका संयुक्त भांडवली संस्था असतात.
व्यापारी बँकेची प्राथमिक कार्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा वित्तीय कणा असलेल्या बँकेची प्राथमिक कार्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे ही बँकेची प्राथमिक कार्ये आहेत. प्राथमिक कार्याद्वारे बँक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. बँकेची प्राथमिक कार्ये पुढील प्रमाणे सांगता येतील.
1. ठेवी स्वीकारणे i) चालू खात्यातील ठेवी:- या प्रकारच्या ठेवी खात्यावर जमा केल्या जातात. या खात्यातील ठेवी ठेवीदारांना केव्हाही परत मागता येतात. त्यासाठी बँकेला पूर्वसूचना द्यावी लागत नाही अशा ठेवी व्यावसायिक, उद्योगपती व व्यापारी यांच्या सोईच्या असतात. ii) बचत खात्यावरील ठेवी:- या प्रकारच्या बचत ठेवी खात्यावर जमा केल्या जातात. ठेवीदारांना या ठेवी त्यांच्या गरजेनूसार परत घेता येतात मात्र या ठेवी आठवड्यातून किंवा वर्षातून किती वेला काढता येतील यावर बंधन असते. या प्रकारच्या ठेवीवर बँका व्याज देत नाही.
iii) मुदत ठेवी:- ज्या ठेवी विशिष्ट मुदतीसाठी ठेवलेल्या असतात त्याना मुदत ठेवी म्हणतात. मुदत पूर्ण होण्यापूर्वी ठेवीदाराला पैसे परतदेत नाही. या ठेवी बँकाच्या दृष्टीने लाभदायक असतात. दीर्घ मुदतीच्या ठेवींना जास्त दराने व्याज दिले जाते. iv) पुनरावर्ती ठेवी:- या प्रकारच्या ठेवींतही ठेवीदाराच्या नावे बँकेत खाते उघडले जाते. ठेवीदार दर महिन्याला किंवा विशिष्ट कालाने विशिष्ट रक्कम बँकेच्या हवाली करण्याचे निश्चित करतो. ही मुदत सहसा एक वर्ष किंवा त्याच्या पटीत दोन वर्षे अशी असते. या मुदतीनंतर ठेवीदाराला व्याजासह रक्कम परत केले जाते.
V) फ्लेक्झी डिपाँझिट- आँटो स्वीप्स:- फ्लेक्झी म्हणजे लवचिक अथवा आँटो स्वीप म्हणजे स्वंयप्रचलित ठेवी ही अशीच एक सुविधा आहे ही सुविधा बचत खाते आणि मुदत खाते अशा दोन्ही ठेवप्रकारांचे लाभ एकत्र करून ग्राहकाला देते. या रकमेवर जादा दराने व्याज दिले जाते
2. कर्जे आणि अग्रिमे देणे i) रोख कर्ज:- कर्जे हवी असणारी व्यक्ती बँकेच्या नियमात असणार्या प्रकारचे तारण घेऊन बँकेकडे जाते ते तारण पुरेसे व विश्वासार्ह असल्याची बँकेची खात्री करून देते. तारण योग्य असल्याचे सिध्द झाल्यास त्या व्यक्ती ला करज मंजूर केले जाते. ii) अधिकर्ष सवलत:- या पध्दतीत कर्जदाराला त्याच्या खात्यात असणार्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी दिली जाते. किती रक्कम जास्त काढता येईल याची मर्यादाही ठरवून दिली जाते. म्हणजेच कर्जदाराच्या खात्यात प्रथम काही रक्कम असणे आवश्यक असते. कर्जदाराने जेवढी रक्कम खात्यातून काढली असेल त्यावरच व्याज आकारले जाते.
iii) मुदत कर्जे:- व्यापारी बँका अल्प मुदतीसाठी एकरकमीही कर्जे देतात iii) मुदत कर्जे:- व्यापारी बँका अल्प मुदतीसाठी एकरकमीही कर्जे देतात.अल्प मुदतीची कर्जे बहुधा एक वर्षासाठी असतात. मध्यम मुदतीची कर्जे एक ततीन वर्षासाठी व दीर्घ मुदतीची कर्जे सहसा तीन ते पाच वर्षे मुदतीची असतात व्यापारी बँका दीर्घ मुदतीची कर्जे देण्यास फारशा इच्छुक नसतात. कारण खातेदारांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी त्याना काही पैसा रोख स्वरूपात जवळ ठेवावा लागतो. iv) बिले वटविणे:- आधुनिक काळात अनेक व्यवहार उधारीवर चालतात. त्यातून निर्माण होणारी बिले वटविण्याचे काम बँका करतात.
V) पैसे देण्याची हमी देणे:- अनेकदा परिचय नसणार्या दोन व्यक्ती किंवा संस्था परस्परांशी व्यवहार करतात. खरेदी व्यवहार करणार्या दोन व्यक्ती अनोळखी असल्यास त्याना ओळखणारी बँक ही मध्यस्थ म्हणून काम करते. खरेदीदाराच्या वतीने त्याच्या पैशाची हमी बँक विकेत्याला देत असते. अशी हमी देताना बँका काहीफी घेत असतात.
व्यापारी बँकेची दुय्यम कार्ये पैशांच्या देवाण घेवाण करण्याबरोबरच बँका वित्तीय किंवा आर्थिक संस्था म्हणून इतरही कार्ये पार पाडत असतात. ग्राहकांचे समाधान व्हावेयासाठी बँका सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे बँका ग्राहकाना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा सेवा पुरविण्याकडे लक्ष देतात. आपली प्रसिध्दी वाढविण्यासाठी बँकाना या दुय्यम कार्यावर भर दयावा लागतो. त्यामुळे बँकांच्या दुय्यम कार्या ची माहीती जाणून घेणे योग्य ठरेल.
1. अभिकर्ता किंवा प्रतिनिधी कार्ये i)देणी देणे:- ग्राहकांच्या लेखी सूचनेवरून बँक विम्याचे हप्ते भरणे, भाडे देणे, फी भरणे, ठरावीक वर्गणी भरणे यांसारखी कामे करते. किती पैसे, कोणत्या तारखेपर्यंत व कोणाला द्यावयाचे याच्या लेखी सूचना देणे आवश्यक असते. ii) पैसे अथवा येणी स्वीकारणे:- खातेदाराच्या वतीने त्याचे पैसे स्वीकारणे किंवा वसूल करण्याचे काम बँक करते खरेदी विक्री व्यवहारातून निर्माण झालेली बिले बँकेकडे पाठवल्यास बँक त्या बिलाचे पैसे वसूल करते व ग्राहकाच्या खात्यात भरते.
iii) कर्जरोख्याची खरेदी विक्री:- बँक खातेदाराच्या वतीने खातेदारांनी सूचना केल्यास कर्जरोखे, शेअर्स, डिबेंचर्स यांची खरेदी विक्री करते. कोणत्या प्रकारच्या पतपत्रांची किती प्रमाणात खरेदी विक्री करायची याची लेखी सूचना खातेदाराने देणे अगत्याचे असते. iv) विश्वस्त किंवा व्यवस्थापक म्हणून काम करणे:- खातेदाराने लेखी सूचना दिली असल्त्यास खातेदाराचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था बँक करते. खातेदाराच्या सूचनेनूसार त्याच्या मालमत्तेचा विश्वस्त म्हणून किंवा त्याच्या इच्छेनुसार व्यवस्थापक म्हणुनही बँक काम करते.
v) प्रतिनिधित्व करणे:- खातेदाराने अथवा बँकेशी संबंधित असणार्या अन्य व्यक्ती ने विनंती केल्यास बँक त्याचे प्रतिनिधी बनून त्याच्यासाठी परदेश प्रवास परवाना मिळवणे संपत्ती कर भरणे आयात निर्यात कर भरणे ही कामे अत्यंत कार्यहमतेने करते. vi) पैशाचे व्यवहार करणे:- ग्राहकांच्या विनंतीवरुन एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पैसे पाठविणे किंवा एका व्यक्तीकडून दुबर्या व्यक्तीला पैसे देण्याचे काम करते. पैसे कोणाला व कोठे द्यावयाचे याची सुचना देऊन पैसे दिल्यास पैसे पोहोचविण्याची व्यवस्था करते.
vii) स्थायी सुचनांचे पालन:- बँकेचा ग्राहक स्वतःच्या वतीने आपल्या खात्यातून विशिष्ट व्यक्तीना पैसे देण्याबाबत स्थायी म्हणजे कायमस्वरूपी सुचना देऊन ठेवू शकतो. अशा सुचनांचे पालन बँक करते आणि अशी देणी देते. तसेच पैसे स्वीकारणे अथवा स्थलांतरीत करणे ही कामेही बँक करते. टेलिफोन बिल भरणे, परगावी असलेल्या व्यक्तीच्या पैसे हस्तांतरीत करणे, इ.सी.एस मार्फत लाभांश अथवा व्याज जमा करुन घेणे इत्यादी कामे स्थायी सुचना घेऊन बँक करतात.
2. सर्वसामान्य लोकोपयोगी सेवा i) वेतन, निवृत्ती इत्यादी देणे आणि लाभांश, व्याज इत्यादी वसूल करणे:- अनेक सरकारी अधिकार्याची पगाराची बिले बँकामध्ये असतात आणि बँका त्यांच्या वतीने ती कोषागाराला सादर करतात.त्याप्रमाणे सेवानिवृत्त लोक आपले निवृत्ती वेतन कोषागारातून प्राप्त करण्याचा अधिकार आपल्या बँकाना देतात. लाभांश आणि व्याज वसूली हे अशाच प्रकारचे कार्य आहे लाभांश पत्र अथवा व्याज पत्र हे कंपन्यानी विवक्षित रक्कम अदा करण्यासाठी बँकांवर काढलेले आदेश असतात. समभाग आणि कर्जरोख्यांची खरेदी विक्री हे अशाच प्रकारचे बँकेचे अभिकर्ता म्हणून काम केले जाणारे कार्य आहे.
ii) परस्पर सहकार्य योजना:- ही खरेतर सर्वसामान्य लोकपयोगी सेवा आहे ii) परस्पर सहकार्य योजना:- ही खरेतर सर्वसामान्य लोकपयोगी सेवा आहे. पैश्याच्या रकमा पाठविण्यासाठी व्यक्ती अथवा संस्था विविध वित्तीय अवलंब करतात. बँकांच्या शाखाचे जाळे दूरवर पसरलेले असल्याने या कामात त्यांची मोलाची मदत होते. iii) बँकांची क्रेडिट कार्डे:- पैशाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रीयेमध्ये कागदी चलनानंतर च्या अवस्थेतेत बँक पैशाचे अनेक प्रकार अस्तित्वात आले. या सतत चालणणार्या उत्क्रांतीच्या प्रक्रीयेत सर्वात ताज्या प्रकारची भर भारतीय वित्त प्रणालीमध्ये टाकली आहे ती म्हणजे क्रेडीड कार्डानी वस्तु व सेवा याच्या खरेदीसाठी पतपुरवठा करण्याचे एक साधन म्हणून बँकानी ही कार्ड प्रचारात आणली आहेत.
iv) स्टाँक इन्व्हेस्ट:- कंपन्यांच्या समभागांसाठी अथवा कर्जरोख्यासाठी अर्ज करणार्या गुंतवणूकदाराची समभाग मंजूर करण्याच्या पद्धतीमुळे बरीच गैरसोय निर्माण होते. समभाग अथवा ऋणपत्राची घोषणा झाल्यावर त्यामवध्ये गुंतवणुक करू इच्छीणारी व्यक्ती प्रथम विशिष्ट संख्येने समभागांची मागणी करते. V) सुरक्षित ताबा:- दागदागिने, इच्छापत्र, खरेदी विक्रीचे करार अशाच इतर मौल्यवान वस्तु अथवा दस्त ऐवज याची सुरक्षितता हा लोकांच्या दृष्टीने नेहमीच काळजीचा विषय असतो. असे हे सर्व सामान्य उपभोगाचे कार्य आधुनिक बँकांनी नियमित व कायदेशीर करून घेतले आहे.
vi) सुरक्षित ठेवगृह:- सुरक्षित ठेवगृह ही बँकेकडून पुरवली जाणारी आणखी एक महत्त्वाची सेवा आहे. जवळ जवळ सर्व बँका आपल्या काही शाखांमध्ये ही सेवा पुरवित असतात. यासाठी बँकांच्या सुरक्षित कोषकक्षात अनेक कप्पे असलेले भक्कम कपाटे ठेवली जातात आणि त्याच्यावर सतत पाहारा राहील अशी व्यवस्था केली जाते. Vii) हुंडा़णावळीचा व्यवहार:- आंतरराष्टीय व्यापारामुळे निर्माण होणारी देणी त्या त्या देशाच्या नाण्याच्या संदर्भात द्यावी लागतात एखाद्या भारतीय व्यापाराने अमेरिकन खरेदी केल्यास त्याला डाँलर या अमेरिकन चलनात पैसे द्यावे लागतात.
END