स्वागतम ! सुस्वागतम ! सुस्वागतम !
मॉंडेल अकाउंटींग सिस्टीम(नमुना १ ते ८) मध्ये पंचायत राज संस्थाचा लेखा ठेवणे बाबत. प्रस्तावना :- भारतीय संविधान ७३ वी दुरुस्ती अधिनियम १९९२ दिनांक २२/०४/१९९३ पासून अमलात आला. भारतीय राज्य घटनेच्या कलम २४३ मध्ये ७३ व्या घटना दुरुस्ती अन्वये ज्या सुधारणा करण्यात आल्या त्या पंचायती राज संस्था मध्ये अत्यत महत्वपूर्ण बदल घडवून आणणाऱ्या अशा आहेत. या घटना दुरुस्ती मुळे संपूर्ण भारत देशात पंचायातीराज सस्थांचे स्वरूप, अधिकार आणि जबाबदा-या याबाबत एकसारखेपणा आणण्यात आला आहे. भारतीय राज्य घटनेचे कलम २४३-जी अन्वये पंचायातीराज संस्थांना अ} समाजाच्या आर्थिक उन्नती साठी व सामाजिक न्यायासाठी नियोजन करणे .
ब} समाजाच्या आर्थिक उन्नती साठी व सामाजिक न्यायासाठी योजना राबविणे . क} भारतीय राज्य घटनेच्या अनुसूची-११ मधील विषयाच्या संदर्भात योजनांचे नियोजन करणे व त्या राबविणे. यांचे अधिकार पंचायती राज संस्थाना देण्याबाबत राज्य शासनास निर्देश दिले आहेत.गांव पातळीवर सर्व सामान्य नागरिकांचा विकासाच्या नियोजनात व अंमलबजावणीत सहभाग राहावा या दृष्टीने गांवातील सर्व मतदारांची ग्रामसभा अस्तित्वात येवून या सभेस सर्व प्रकारच्या विकासाच्या योजना सामाजिक सुरक्षा, आरोग्य, शिक्षण इ. बाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले. भारतीय घटनेच्या कलम २४३-एच अन्वये पंचायती राज संस्थाना विविध प्रकारचे कर आकारण्याचे, ते वसूल करण्याचे आणि प्राप्त रकमेचा समाजासाठी विनियोग करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. त्याच बरोबर राज्य शासन जे कर, फी वसूल करते त्यात पंचायत राज संस्थांचा हिस्सा निश्चित करण्याचे राज्य शासनास निर्देश देण्यात आले. कलम २४३-आय अन्वये प्रत्येक राज्यात पंचायती राज संस्थांच्या वित्तीय / आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी “ वित्त आयोग” स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
राज्य वित्त आयोगाने राज्य व पंच्यातीराज संस्था यांचे बाबत निधीचे वाटप कशाप्रकारे करावे यांच्या वित्तीय तत्वांची शिफारस राज्यपालाकडे करावयाची आहे. केंद्र शासनाने देखील वरील कारणास्तव केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना केलेली आहे. केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्राचा निधी देशातील सर्व पंचायती राज संस्थाना वितरीत करण्यात येतो. केंद्र तसेच राज्य शासनातर्फे ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हापरिषद या सर्वाना दिलेल्या निधीचा योग्य विनियोग होतो किंवा नाही हे केंद्र व राज्य शासनास समजणे आवश्यक आहे. ७३ व्या घटना दुरुस्तीमागे पंचायती राज संस्थांचे बळकटीकरण करणे, सामाजिक विकास, सर्वसामान्य नागरिक व महिला यांचा विकास कामात सहभाग व शासकीय कामात पारदर्शकता आणणे हा उद्देश आहे.
उपरोक्त उद्देश सफल होण्यासाठी सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी यांना पंचायती राज संस्थांचा आर्थिक व्यवहार समजणे आवश्यक आहे. यासाठी ११ व्या वित्त आयोगाने केंद्र शासनास सन २००१ मध्ये पंचायती राज संस्थासाठी समजण्यास सोपा, सरळ परंतु सर्वसमावेशक असा लेख्याचा नमुना तयार करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये पंचायती राज संस्थांच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे , जबाबदारीची निश्चिती करणे हा उद्देश आहे. यासाठी केंद्र शासनाच्या पंचायती राज मंत्रालयाने तांत्रिक समिती, उपसमिती अशा समित्या स्थापन करून २९ जानेवारी २००९ रोजी “जमा व खर्च” लेखा तयार केला. व त्यास समितीने मान्यता देवून तो केंद्र शासनाने स्वीकारला आहे. हाच लेखा आज आपल्या समोर Model Accounting System या नावाने आहे. मॉडेल अकाउंटिंग सिस्टीम सदर लेखांकन पद्धत सर्वसामान्य नागरिक, तळातील लोक प्रतिनिधी यांना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेली आहे. हि लेखांकन पद्धत अत्यंत साधी, सुलभ आणि सरळ अशी आहे. ती तळातील लोक प्रतिनिधी आणि सामान्य माणसास सहज समजेल अशी आहे.
ही लेखांकन पद्धत अंगीकारण्या बाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक ३० मार्च २०१० रोजी आदेश व नमुना १ ते ८ निर्गमित केलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने नवीन नमुना १ ते ८ मध्ये लेखे ठेवण्याचे आदेश निर्गमित करून तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरी महाराष्ट्रातील पंचायतराज संस्था नवीन लेखांकन पद्धतीने लेखे ठेवू शकले नाही. यामागील कारणांचा विचार करता ढोबळ मानाने खालील करणे दिसून येतात. प्रस्थापित लेखांकन पद्धत नवीन लेखांकन पद्धतीचा गांभीर्याने विचार न करणे. नमुना -१ जमा व खर्च लेखा अपूर्ण दिसणे . नवीन नमुन्यात लेखे कसे ठेवावेत या बाबतच्या सूचनांचा अभाव प्रस्थावित लेखांकन पद्धत व नवीन लेखांकन पद्धत याचा ताळमेळ न बसणे. ग्राम पंचायत व पंचायत समिती स्तरावर मनुष्यबळाचा अभाव. कामाचा वाढता बोजा सक्षम व प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव कामाच्या योग्य वाटपाचा अभाव तळातील यंत्रणेवरील योग्य नियंत्रणाचा अभाव.
केंद्र शासन पंचायती राज मंत्रालयाच्या उप समितीने जेव्हा हे नमुने तयार केले तेव्हा त्यांच्या समोर संपुर्ण देशातील पंचायती राज संस्था होत्या. नमुना 1 ते 8 हे भारत देशातील सर्व राज्य व केंद्र शासीत प्रदेशासतील पंचायतीराज संस्था यांच्यासाठी लागू केले आहेत. नमुना 1 ते 8 मधील नमुना क्रमांक – 1 हा मासिक लेखा व वार्षिक लेखा म्हणून वापरावयाचा आहे. या नमुन्यात लेखाशिर्ष विहित करीत असतांना केंद्र शासनाच्या उप समिती समेार भारतीय संविधानाच्या अनुसूची-11 मधील एकुण 29 विषय होते. उपसमितीने या 29 विषयाला – 1) जमा लेखाशिर्ष 2) महसूल खर्च लेखाशिर्ष आणि 3) भांडवली खर्च लेखाशिर्ष प्रथमत: दिले या 29 विषयाच्या अनुषंगाने नमुना नंबर 1 मध्ये जमा व खर्चाचे प्रधान लेखाशिर्ष,गौण लेखाशिर्ष देण्यात आले आहे. नमुना – 1 मधील सर्वाधिक प्रधान लेखाशिर्ष व गौण् लेखाशिर्ष हे केंद्रीय योजनांना लागु होतात. राज्य घटनेच्या अनुसूची – 11 मधील विषय व त्यांचे लेखाशिर्ष पुढील प्रमाणे आहेत.
भारतीय संविधानाच्या अनुसुची – 11 मधील विषय जमा व खर्चाचे लेखाशिर्ष अ.क्र. 11व्या अनुसूचीमधील विषय सुधारीत प्रधान लेखाशिर्षासाठी केलेले नामाभिधान समांतर प्रधान लेखाशिर्ष जमा महसुली खर्च भांडवली खर्च 1 2 3 4 5 6 कृषि, कृषि विस्तारासह 0435 2435 4435 जमीन सुधारणा, जमीन वाटप जमीनीचे एकत्रीकरण व मृद संधारण मृद व जल संधारण - 2402 4402 लघु सिंचन, जल व्यवस्थापन व जल प्रकल्प सुधारणा लघु सिंचन 0702 2702 4702
4 पशुसंवर्धन , दुग्ध विकास व कुकुट पालन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुट पालन, इंधन व वैरण विकास 0403 2403 5 मत्स्य व्यवसाय 0405 2405 4405 6 सामाजिक वनिकरण आणि वन शेती वनिकरण 0406 2406 4406 7 गौण वन उपज 8 लघुद्योग, खाद्य पदार्थ प्रक्रिया उद्योग ग्रामिण व लघु उद्योग 0851 2851 4851 9 खादी, ग्रामोद्योग व कुटीरोद्योग 10 ग्रामिण गृह निर्माण 0216 2216 4216 11 पिण्याचे पाणी पाणी पुरवठा व स्वच्छता 0215 2215 4215 12 इंधन व वैरण पशुसंवर्धन , दुग्ध व्यवसाय कुकुट पालन आणि इंधन व वैरण -
13 रस्ते, मो-या,(culvert) पुल, घाट जलमार्ग व इतर दळणवळणाची साधने परिवहन - 3054 5054 14 ग्रामिण विदयुतीकरण व विद्युत वितरण ग्रामिण विदयुतीकरण 0801 2801 4801 15 अपारंपारिक उर्जा स्त्रोत 0810 2810 4810 16 दारिद्र/गरीबी निर्मुलन कार्यक्रम गरीबी निर्मुलन कार्यक्रम 2501 17 शिक्षण, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिक्षण 0202 2202 4202 18 तांत्रिक, प्रशिक्षण व व्यावसायीक शिक्षण 2203 19 प्रौढ शिक्षण व अनौपचारीक शिक्षण 20 ग्रंथालये कला, संस्कृति व ग्रंथालये 2205 4205
21 सांस्कृतिक कार्यक्रम कला, संस्कृति व ग्रंथालये - 2205 4205 22 बाजार आणि जत्रा 0206 2206 4206 23 आरोग्य व स्वच्छता रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व दवाखाने या सह आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता 0210 0215 2210 2215 4210 4215 24 कुटुंब कल्याण आरोग्य व कुटुंब कल्याण 25 महिला व बाल विकास 2211 26 समाज कल्याण, अपंग व मतीमंद कल्याणासह सामाजिक सुरक्षा व कल्याण 2235 4435 27 दुर्बल घटकांचे कल्याण विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे कल्याण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर दुर्बल घटकांचे कल्याण 2225 28 सार्वजनिक वितरण व्यवस्था 2408 4408 29 सार्वजनिक मालमत्तेचे परिरक्षण 0059 2059
सदर नमुन्यात राज्य शासनाच्या योजनांना, लेखाशिर्ष विहित केलेले नाहीत सदर नमुन्यात राज्य शासनाच्या योजनांना, लेखाशिर्ष विहित केलेले नाहीत. भारतातील विविध राज्यांमध्ये आणि केंद्र प्रशासीत प्रदेशात वेगवेगळया प्रकारच्या वैशिष्टयपूर्ण व विपूल योजना राबविल्या जातात. त्यासाठी वेगवेगळी लेखाशिर्ष वापरले जातात म्हणून केंद्र सरकारच्या उपसमितीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनामध्ये परिच्छेद क्रमांक 4 राज्य शासन राबवित असलेल्या योजनांसाठी पंचायती राज संस्थांनी स्वतंत्र प्रधान लेखाशिर्ष वापरण्यास परवानगी दिलेली आहे. राज्यातील पंचायती राज संस्था जी प्रधान लेखाशिर्ष वापरत आहे ती प्रधान लेखाशिर्ष सबंधित राज्याचे महालेखापाल, महालेखापाल (लेखा परीक्षण) व महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) यांना कळवावयाची आहेत. महाराष्ट्रातील पंचायती राज संस्था मुंबई ग्राम पंचायत अधिनियम 1958 ची अनुसूचि – 1 व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 च्या अनुसूचि 1 व 2 मध्ये विहीत केलेल्या विषया संबंधात वेगवेगळया योजना राबवितात.
या योजनामध्ये देखील विविधता आहे या योजनामध्ये देखील विविधता आहे. या योजनाना नमुना -1 मधिल प्रधान लेखाशिर्ष देणे सहज शक्य असल्याने या लेख्यात प्रधान लेखाशिर्ष व गौण लेखाशिर्ष नमुना नं. 1 मधील ठेवण्यात आले आहे. परंतू योजनांचा उद्देश व खर्चाचे स्वरुप स्पष्ट होण्याच्या दृष्टीने Object code (उदिष्ट संकेतांक) देणे आवश्यक आहे. नमुना 1 सोबत केंद्रिय उपसमितीने ठरविलेले उद्दिष्ट संकेतांक अपुरे आहेत. त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासनाने विहीत केलेल्या व सध्या वापरात असलेल्या उद्दिष्ट संकेतांकाशी ते जुळत नसल्याने पंचायती राज संस्थांच्या स्व-उत्पन्नाच्या योजनाना महाराष्ट्र शासनाने विहित केलेले उद्दिष्ट संकेतांक (Object code) वापरण्याचे ठरले. दिनांक 2 ऑगस्ट 2013 रोजी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत ही अडचण मा. सह सचिव, पंचायती राज, मंत्रालय नवी दिल्ली, महालेखापाल व केंद्रीय सूचना केंद्र प्रमुख यांच्या निदर्शनास आणून महाराष्ट्र शासनाने विहीत केलेले Object code वापरण्याची परवानगी घेतली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या विविध योजनांना, योजनांचे स्वरुप विचारात घेवून महाराष्ट्र शासनाने विहीत केलेल्या Object code पैकी एक किंवा अधिक Object code विहीत करण्यात आले आहेत.
लेख्याची मांडणी किंवा रचना :- पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये जे आर्थिक व्यवहार ज्या निधीतून होतात ते विचारात घेऊन लेख्याची मांडणी किंवा रचना करणे आवश्यक आहे. पंचायत समिती :- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता 1968 च्या नियम 61 अन्वये पंचायत समितीच्या स्व-उत्पन्नाचे लेखे स्वतंत्रपणे ठेवणे आवश्यक आहे. तसेच लेखा संहितांचे परिशिष्ट पाच मधील सूचना विचारात घेवून लेख्यांची रचना खालील प्रमाणे केली आहे.
पंचायत समिती मध्ये सर्व साधारणत: खालील प्रमाणे आर्थिक व्यवहार केले जातात. अ) पंचायत समितीचे स्वउत्पन्न - ब) जि.प.चे स्व-उत्पन्न क) हस्तांतरीत योजना – कलम 100 ड) अभिकरण योजना - कलम 123 ई) भांडवली खर्च - कलम 100 व 123 2) जिल्हा परिषद :- जिल्हा परिषदे मध्ये अ) जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न ब्) हस्तांतरीत योजना क) अभिकरण योजना ड) भांडवली खर्च
नवीन format १ व २ मध्ये लेखा अद्यावत व बिनचूक करण्याच्या दृष्टीने पंचायत समित्या व जिल्हा परिषदेच्या सध्या वापरत असलेल्या लेख्याच्या नमुन्यात खालील प्रमाणे किरकोळ सुधारणा करणे आवश्यक आहे न न ७ – सामान्य रोखवही (लेखा संहितांचे नियम ४९ व ५७) वर्गीकरण या रकान्यात जमा व खर्च बाजूस प्रधान लेखा शीर्ष नमूद करावे न न १० – पावती (लेखा संहितांचे नियम ५०) पावतीच्या शिर्षभागी जमेचे प्रधान लेखाशीर्ष नमूद करावे. न न ११ – प्राप्त धनादेश नोंदवही (लेखा संहितांचे नियम ५०) शेरा या रकान्यापुर्वी जमेचे प्रधान लेखाशीर्ष नमूद करावे. न न १३ – जमा नोंदवही (लेखा संहितांचे नियम ५५) format १ मधील जमेचे प्रधान लेखाशीर्ष व गौण लेखाशीर्ष प्रत्येक पानावर नमूद करून त्यास पुरेशी पृष्ठे सोडावीत न न १४ – खर्चाची नोंदवही (लेखा संहितांचे नियम ५८ व ६० ) format १ मधील खर्चाचे प्रधान लेखाशीर्ष व गौण लेखाशीर्ष , उद्दिष्ट संकेतांक प्रत्येक पानावर नमूद करून त्यास पुरेशी पृष्ठे सोडावीत न न १९ – संकलन नोंदवही मध्ये format १ मधील जमा व खर्च बाजूचे प्रधान लेखाशीर्ष,गौण लेखाशीर्ष व उद्दिष्ट संकेतांक नमूद करावेत
वरील बाबी विचारात घेवून नमुना नं वरील बाबी विचारात घेवून नमुना नं. 1 मध्ये खालील प्रमाणे लेख्याची रचना केली आहे. नमुना नं. - एक जमा बाजु खर्च बाजु प्रारंभिची शिल्लक एक) हाती असलेली रोख रक्कम दोन) बँकेतील शिल्लक तीन) कोषागारातील शिल्लक चार) गुंतवणूक एकुण जमा लेखाशर्ष जमेचा तपशील अर्थसंकल्पीय तरतूद प्रत्यक्ष जमा लेखाशिर्ष तपशील प्रत्यक्ष खर्च योजना अंतर्गत योजनेत्तर योजना 1 2 3 4 5 6 7 8 9 भाग १-अ)पंचायत समिती स्व उत्पन्न ब) जिल्हा परिषद स्वउत्पन्न भाग २) भांडवली लेखा हस्तांतरीत योजना – अ) महसुली जमा व महसुली खर्च ब) भांडवली जमा व भांडवली खर्च अभिकरण योजना - अ) महसुली जमा व महसुली खर्च ब) भांडवली जमा व भांडवली खर्च
प्रधान लेखाशिर्षाबाबतची संदिग्धता मॉडेल अकाउंटिंग सिस्टीम मध्ये घटनेच्या अनुसूची – 11 मधील विषयाला विहित केलेले प्रधान लेखाशिर्ष आणि राज्य शासन वापरत असलेले लेखाशिर्ष या मध्ये काही बाबतीत संदिग्धता दिसुन येते. M.A.S. Format – 1 मध्ये सामान्य प्रशासन विभागाचे 2053 हे लेखाशिर्ष दिलेले नाही. मार्गदर्शक सुचना परि. 4 मधील तपशीलानुसार हस्तांतरीत योजना अंतर्गत जमेचे प्रधान लेखाशिर्ष 1601 – 102 राज्य शासनाच्या अनुदानाखाली या लेखाशिर्षाचा समावेश केलेला आहे. 2) M.A.S. Format – 1 मध्ये प्रधान लेखाशिर्ष 2211 हे महिला व बाल कल्याण विभागासाठी विहित केलेले आहे. परंतू राज्य शासनाकडून महिला व बाल कल्याण विभागाला – 2235 या प्रधान लेखाशिर्षा खाली अनुदान दिले जाते. या साठी प्रधान लेखाशिर्ष 1601 खाली – महिला व बाल कल्याण चे अनुदान 2235 या प्रधान लेखाशिर्षाखाली घेउुन खर्च 2235 खाली नोंदवावा.
3) M.A.S. Format – 1 मध्ये कृषी विभागाचे 2401 हे प्रधान लेखाशिर्ष विहित केलेले नाही. राज्य शासनाकडून 2401 या प्रधान लेखाशिर्षाखाली अनुदान प्राप्त होत असल्याने, हस्तांतरीत योजना व अभिकरण योजनेखाली प्रधान लेखाशिर्ष 1601 खाली 2401 लेखाशिर्ष समाविष्ठ करुन खर्च देखील 2401 खाली नोंदवावा. M.A.S. Format – 1 मधील 2435 हे कृषी विभागाचे लेखाशिर्ष वापरावयाचे नाही. 4) अभिकरण योजने अंतर्गत महिला व बाल कल्याण विभागास 2236 या प्रधान लेखाशिर्षाखाली अनुदान प्राप्त होते. परंतू M.A.S. Format – 1 मध्ये 2236 हे प्रधान लेखाशिर्ष विहीत केलेले नाही. अभिकरण योजनेखाली 1601 – 101 केंद्र शासन व 102 राज्य शासन या खाली 2236 या लेखाशिर्षा अंतर्गत जमा दर्शवून याच लेखाशिर्षाखाली खर्च नोंदवावा.
अभिकरण योजने अंतर्गत ग्रामीण कुटुंब कल्याण – 2211 या लेखाशिर्षाखाली अनुदान प्राप्त् होते. M.A.S. मध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण हे दोन विषय एकत्रीत करुन 2210 हे एकच प्रधान लेखाशिर्ष विहित केलेले आहे. तेव्हा अभिकरण योजने अंतर्गत 2211 हे प्रधान लेखाशिर्ष जमा व खर्च बाजूस दर्शवून जमा खर्च नोंदवावा. भांडवली खर्च जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या लेख्यात आतापर्यंत वेगळयाने भांडवली खर्च नोंदविल्या जात नव्हता. M.A.S. Format – 1 मध्ये – 4000 – भांडवली जमा 800- इतर जमा असे दोन जमेचे लेखाशिर्ष दिले आहेत. खर्चाच्या बाजूस मात्र 18 प्रधान लेखाशिर्ष दिलेली आहेत. भांडवली स्वरुपाची कामे करण्यासाठी राज्य शासनाकडून महसुली लेखाशिर्षाखाली व भांडवली लेखाशिर्षाखाली अनुदाने दिली जातात.
या अनुदानाचे योग्य व अचूक लेखांकन होण्याच्या दृष्टीने जमेचे प्रधान लेखाशिर्ष – 4000 खाली ज्या लेखाशिर्षाखाली अनुदान प्राप्त झाले आहे. ते लेखाशिर्ष दर्शवून अनुदान जमेस घ्यावे व त्याच्याशी समांतर भांडवली लेखाशिर्षाखाली खर्च नोंदवावा. असा निर्णय घेतला आहे. उदाहरनार्थ :- 4000 :- शिक्षण विभाग 2202 – 0138 -53 – जि.प.प्रा.शा.इमारत 4202 – बांधकाम 2202–0138 -53 - प्राथमिक शाळा इमारत बांधकाम आरोग्य विभाग 2210 -4751-53- प्रा.आ.के.इमारत बांधकाम 4210 – 2210-4751-53- प्रा.आ.के.इमारत बांधकाम पाणी पुरवठा 2215-1226-53 पाणी पुरवठा योजना- 4215 – 2215-1226-53- पाणी पुरवठा योजना 3451-2479-53 नळाव्दारे पाणी पुरवठा योजना- 3451-2479-53- नळाव्दारे पाणी पुरवठा
सदर नमुन्याची विभागणी नमुना न.1 प्रमाणे नमुना नं. 2 एकत्रित गोषवारा ----------- या वर्षासाठी ------------- यांच्या एकत्रित गोषवा-याची नोंदवही जमा बाजू खर्च बाजू लेखाशिर्ष अर्थसंकल्पीय तरतूद एप्रिल योजनांतर्गत योजनेत्तर 1 2 3 4 5 6 7 8 सदर नमुन्याची विभागणी नमुना न.1 प्रमाणे भाग १-अ)पंचायत समिती स्व उत्पन्न ब) जिल्हा परिषद स्वउत्पन्न भाग २) भांडवली लेखा हस्तांतरीत योजना – अ) महसुली जमा व महसुली खर्च ब) भांडवली जमा व भांडवली खर्च अभिकरण योजना - अ) महसुली जमा व महसुली खर्च ब) भांडवली जमा व भांडवली खर्च अशी करण्यात यावी. नमुना 1 मधील लागु असलेले सर्व लेखाशिर्ष जमा व खर्च बाजूस घेण्यात यावेत.
जमा बाजू :- नमुना नं.13 :- जमा नोंदवही : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता 1968 च्या नियम 55 नुसार पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना प्राप्त होणा-या सर्व प्रकारच्या रकमासाठी सदर नोंदवही ठेवावयाची आहे. या नोंदवहीत देखील वरील प्रमाणे विभागणी करुन नमुना नं. 1 मधील लागु असलेली जमेची सर्व लेखाशिर्ष टाकावित. एक प्रधान लेखाशिर्ष स्कीम कोड व ऑब्जेक्ट कोड साठी पुरेशी पृष्ठे ठेवावीत. प्रत्येक दिवसाच्या अखेरीस प्रधान व गौण लेखाशिर्ष खाली जमा झालेल्या रक्कमांची बेरीज करण्यात यावी. या बेरजा रोख वहितील जमा बाजू “ जमा रकमा “ या स्तंभाखाली एकुण बेरजांशी ताडून पहावयाच्या आहेत. विशिष्ट लेखाशिर्षाखालील मासिक जमा काढण्यासाठी रक्कमांची चढती /प्रगत बेरीज करावयाची आहे. दैनिक व चढत्या बेरजा दररोज तपासुन त्या अचुक असल्याबाबत पंचायत समिती मध्ये सहाय्यक लेखा अधिकारी /कनिष्ठ लेखा अधिकारी यांनी व जिल्हा परिषदे मध्ये सहाय्यक लेखा अधिकारी यांनी त्यावर अद्याक्षरी करावयाची आहे. अशा प्रकारे एका प्रधान –गौण व उप लेखाशिर्षाखालील एकूण मासिक जमेची रक्कम नमुना नं. 2 च्या संबंधित महिन्यात संबंधित लेखाशिर्षा समेार दर्शवावी.
खर्च बाजू :- नमुना नं. 14 खर्चाची नोंदवही महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता 1968 च्या नियम 58 मध्ये विहित केलेल्या पद्धतीने खर्चाची नोंदवही ठेवावयाची आहे. या नोंदवहीत देखील – अ) पंचायत समिती स्व-उत्पन्न ब) जि.प. स्व-उत्पन्न क) हस्तांतरी योजना ड) अभिकरण योजना इ) भांडवली खर्च अशी विभागणी करण्यात यावी. या नोंदवही मध्ये नमुना नं. 1 मधील खर्चाची प्रधान लेखाशिर्ष, गौण लेखाशिर्ष व उद्दिष्ट संकेतांक या साठी स्वतंत्र व पुरेशी पृष्ठे ठेवावीत. या नोंदवहीत प्रत्येक दिवशी झालेल्या प्रदानांची प्रधान लेखाशिर्ष, गौण लेखाशिर्ष व उद्दिष्ट संकेतांका खाली नोंद घेवून त्याची प्रत्येक दिवशी प्रगत बेरीज घेण्यात यावी व महिन्या शेवटी आलेली बेरीज नमुना नं. 2 मध्ये संबंधित लेखाशिर्षा समोर संबंधित महिन्याच्या रकान्यात दर्शवावी.
------------------ या महिन्याचे मासिक हिशेब मेळ विवरण पत्र नमुना नं. तीन ------------------ या महिन्याचे मासिक हिशेब मेळ विवरण पत्र तपशील रक्कम रुपये बँकेतील कोषागारातील रोख पुस्तिके प्रमाणे शिल्लक अ) अधिक एक) बँकेत / कोषागारात थेट धनादेशाद्वारे / रोख स्वरुपात भरलेली परंतु रोख पुस्तकात नोंद न केलेली रक्कम दोन) पंचायत राज संस्थांनी निर्गमित केलेले परंतु बँकेत / कोषागारात अद्याप न वटविलेले धनादेश इत्यादीचा तपशील तीन) आहरीत केलेले परंतु संबंधितास वाटप न केलेले धनादेश चार) निर्गमित केलेले तथापि बँकेने अस्वीकृत केलेले धनादेश पाच) रोख पुस्तकात जमा खाती नोंद न झालेले बँकेतील रकमेवरील व्याज
तपशील रक्कम रुपये बँकेतील कोषागारातील ब) वजाती एक) मिळालेल्या व रोख नोंदवहीमध्ये नोंद घेतलेल्या परंतु प्रत्यक्षात बँक / कोषागारात जमा न केलेल्या धनादेशांचा तपशील इत्यादी. दोन) संबंधितांकडून मिळालेले व बँकेत भरणा केलेले परंतु बँकेने नाकारलेले धनादेश. तीन) बँकेच्या शिलकीतून वजा केलेला तथापि रोख नोंदवहीमध्ये नोंद न केलेला (बँक आकार) रोख वहीनुसार अखेरची शिल्लक बँक / कोषागाराने कळविल्याप्रमाणे असलेली शिल्लक फरकाची रक्कम (कोणतीही असल्यास) फरकाच्या रकमेचा तपशील
येणे व देणे रकमांबाबतचा नमुना नमुना – चार येणे व देणे रकमांबाबतचा नमुना ........................या वर्षाअखेरीस प्राप्य व देय असलेल्या रकमांबाबतचा तपशील............................. प्राप्य रकमा देय रकमा अ. क्र. लेखा शिर्ष तपशील रक्कम रुपये 1 2 3 4 5 6 7 8 0029-901 सामान्य उपकर शासन खाती जमा झालेली परंतु जि.प.ला प्राप्त न झालेली रक्कम 8443-101इसारा रक्कम कंत्राटदाराकडुन जमा करण्यात आलेल्या परंतु परत करावयाच्या रकमा 0029-901 वाढीव उपकर 8443-102 सुरक्षा ठेव कार्यक्रम सुरक्षा अनामत 0030-901 मुद्रांक शुल्क अनुदान मुद्रांक शुल्क अनुदानाची थकबाकी 8443-102 इतर ठेवी ठेवीदाराकडुन जमा करण्यात आलेल्या परंतु परत करावयाच्या रकमा 800 - इतर जमा मुद्राणालया ची येणे असलेली बाकी मुद्राणलयातून छपाई करुन देण्यासाठी प्राप्त होणारी परंतु न मिळालेली रक्कम 7610-101 घर बांधणी अग्रीम वसुल झालेली परंतु शासनास परत करणे बाकी असलेली रक्कम 0215-101 पाणी पुरवठा योजनेची पाणी पटटी वसुल व्हावयाची पाणीपट्टीची रक्क्म अदत्त बीले अदत्त देयक ज्या लेखा शिर्षाचे आहे ते लेखा शीर्ष दर्शवावे. लेखा संहिता 1968 चे नियम 54 प्रमाणे अदत्त देयकाची माहिती वर्ष अखेर 8550-101 अग्रीमाची वसुली कर्मचा-याकडून वसुल व्हावयाचे अग्रीम कर्मचा-यांना व खाते प्रमुखांना दिलेल्या परंतु वसुल/ समायोजीत न झालेली अग्रीमाची रक्कम 8443-103 इतर निधी 1) पाणी पुरवठा व देखभाल दुरुस्ती निधी पाणी पुरवठा व देखभाल दुरुस्ती निधी ला देणे बाकी असलेले अंशदान अग्रीमाची वसुली ब) वसुल व्हावयाचे स्थायी अग्रीम खाते प्रमुख व ग.वि.अ. यांना दिलेली परंतु परत न मिळालेली स्थायी अग्रीमाची रक्कम 8443-103 इतर निधी 2) निवृत्ती वेतन निधी निवृत्ती वेतन निधी ला देणे बाकी असलेले अंशदान 8443-103 हातपंप दुरुस्तीची येणे वर्गणी रक्कम हातपंप दुरुस्तीसाठी ग्रामपंचायती कडून येणे असलेली वर्गणीची रक्कम 8443-103 इतर निधी 3) घसारा निधी घसारा निधी ला देणे बाकी असलेले अंशदान 9 800 ज्या लेखा शिर्षा खाली शासना कडून येणे बाकी असलेले लेखा शिर्ष दर्शवावे शासनाने शासन अनुदानातून घेतलेल्या योजना/कामे यांचे साठी प्राप्त व्हावयाच्या रकमा 0029-90 प.स. ला देय हिस्सा वाढीव उपकर कोषागारातुन आहारीत केलेली परंतु प.स.ला न दिलेली वाढीव उपकराची रककम
प्राप्य रकमा देय रकमा अ.क्र. लेखा शिर्ष तपशील रक्कम रुपये अ.क्र 1 2 3 4 5 6 7 8 10 0030-901 ग्रा.प.ला. देय मुद्रांक शुल्क चा हिस्सा कोषागारातुन आहारीत केलेली परंतु ग्रा.प. ला न दिलेली मुद्रांक शुल्काची रककम 11 0206-901 ग्रा.पं. ला देय बाजार उत्पन्नाचा हिस्सा बाजार उत्पन्न म्हणुन प्राप्त झालेली परंतु ग्रा.प. ला अदा न केलेली रककम 12 8011- निवृत्ती वेतन अंशदान (प्रतिनियुक्ती) प्रतिनियुक्तीवरील कर्मचा-याचे देय असलेले परंतु अद्याप देण्यात न आलेल्या अंशदानाची रक्कम 13 8011- रजा वेतन अंशदान (प्रतिनियुक्ती) 14 लेखा परिक्षन परिछेदा नुसार वसुल रकमा ज्या लेखा शिर्षा खाली वसुली झाली ते लेखा शिर्ष दर्शवावे. लेखा परिक्षणातील परिछेदा नुसार वसुल झालेल्या परंतु शासनास भरणा न केलेल्या रकमा 15 शासनास परत करावयाचे अखर्चित अनुदान ज्या लेखा शिर्षाखाली अखर्चित अनुदान असेल ते लेखा शीर्ष दर्शवावे . प्राप्त शासन अनुदानाची अखर्चित व शासनास परत करावयाची रक्कम
स्थावर मालमत्तेचा नमुना नमुना – पाच स्थावर मालमत्तेचा नमुना सन -------------- या वर्षासाठी ----------------- च्या स्थावर जंगम मालमत्तेची नोंदवही (अ) मार्ग अनु क्रमांक मार्गाचे/ठिकाणाचे नाव पासूनचे गाव/स्थान पर्यंतचे गाव/स्थान एकूण लांबी (कि.मी.) मध्ये साधारण रुंदी (फुट/मीटर) बांधकाम केल्याचा दिनांक दुरुस्तीचा दिनांक एकूण खर्च (रुपयांमध्ये) दर कि.मी. साठी बांधकामाचा सरासरी खर्च शेरा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 (ब) जमीन अ. क्र. हस्तांतरीत /खरेदी किंवा संपादित केल्याचा दिनांक कोणाकडून हस्तांतरीत /खरेदी / संपादित केलेले प्रयोजन करार, बक्षिस इत्यादी विषयक संदर्भ जमिनीचे क्षेत्रफळ एकर मध्ये हददीसहीत भूमापन क्रमांक इत्यादी निर्धारण / मुल्य जमीनीच्या हददीचे रेखाटन उपलब्ध आहे किंवा कसे इमारत, जमिनीसह संपादित केली असल्यास जमिनीचा / इमारतीचा वापर भरलेली रक्कम रुपये प्रमाणकाचा क्रमांक, दिनांक आणि शेरा बांधकामाचा थेडक्यात तपशील पायाचे क्षेत्रफळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
क) इतर :- अ. क्र. संपादन, खरेदी बांधकाम किंवा प्राप्ती किंवा हस्तांतरण यांचा दिनांक ज्या आदेशान्वये मालमत्ता संपादित केली/ खरेदी केली, बांधकाम केले/ हस्तांतरित केली त्या आदेशाचा क्रमांक व दिनांक स्थावर मालमत्तेचे वर्णन व ठिकाण ज्या प्रयोजना साठी मालमत्ता संपादित केली ते प्रयोजन वर्षाच्या सुरुवातीला सदर मालमत्तेचे मूल्यांकन पुनर्मूल्यांकन काही असल्यास पुनर्मूल्यांकनाची प्रत्यक्ष किंमत व दिनांक (नियमा प्रमाणे) नियमा प्रमाणे घसारा/ वाढ वर्षा अखेरचे मूल्यांकन निकालात काढण्यात आली असल्यास त्यांचा दिनांक निकालात काढल्याची कारणे प्राधिकारा सह निकालात काढल्या नंतर वसूल केलेली रक्कम (रुपयात) सक्षम प्राधिका-याच्या नावाची आद्याक्षरे शेरा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
नमुना – सहा जंगम मालमत्ता चा नमुना जंगम मालमत्तेची ................. या वर्षासाठी ....................... ची नोदवही अ.क्र. संपादित केल्याचा खरेदी, केल्याचा हस्तांतरीत करुन प्राप्त झाल्यावर रचना केल्याचा दिनांक ज्या आदेशान्वये मालमत्ता संपादित केली, खरेदी केली त्याबाबत रचना केली/ हस्तातरित केली त्या आदेशाचा क्रमांक व दिनांक मालमत्तेचे वर्णन व स्थ्िाती सदर मालमत्ता कोणत्याही प्रयोजना साठी वापरण्यात आली आहे किंवा कसे वर्षाच्या सुरुवातीला सदर मालमत्तेचे मूल्यांकन पुनर्मूल्यांकन कोणतेही असल्यास आणि पुनर्मूल्यांकनाची प्रत्यक्ष किंमत व दिनांक (नियमा प्रमाणे) नियमा प्रमाणे घसारा वर्षाच्या अखेरीस सदर मालमत्तेचे मूल्यांकन निकालात काढण्यात आली किंवा कसे निकालात काढल्याची कारणे / प्राधिकार निकालात काढल्या नंतर वसूल केलेली रक्कम (रुपयात) सक्षम प्राधिका-याच्या नावाची आद्याक्षरे शेरा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
बाबींचे वर्णन नमुना – सात वस्तुसुची नोंदवहीचा नमुना .................महिना / वर्षासाठीची ....................... वस्तुसुची नोंदवही बाबींचे वर्णन दिनांक प्रारंभिक शिल्लक प्रमांक क्रमांक व दिनांक कोणाकडून प्राप्त झाले जमा एकूण कोणास व कोणत्या उद्देशासाठी देण्यात आले देण्यात आले किंवा विकण्यात आले अखेरची शिल्लक निर्गमित करणाऱ्या अधिकार्याची स्वाक्षरी स्वीकार णाऱ्या अधिकार्याची स्वाक्षरी प्रमाण मूल्य 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17
मागणी,संग्रह आणि शिल्लकीचा नमुना नमुना – आठ मागणी,संग्रह आणि शिल्लकीचा नमुना .................महिन्याची /.................वर्षाची मागणी, संग्रह आणि शिल्लक यांची नोंदवही अ.क्र. ज्या व्यक्तीकडून कर देय आहे त्या व्यक्तीचे नाव व पत्ता कर पात्र व्यक्तीच्या नोंदवहीतील संदर्भ अनु क्रमांक चालू मागणी मागील वर्षातील थकबाकी, कोणतीही असल्यास निर्लेखित करण्याबाबतची आणि निलंबनाची परवानगी कोणतीही असल्यास देय असलेली एकूण रक्कम (4+5)-6) वसूल केलेली एकूण रक्कम मागील वर्षातील थकबाकी चालू वर्ष एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10
धन्यवाद !