कोन - कोटीकोन A C P B Q R ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते अशा कोनांना परस्परांचे कोटीकोन असे म्हणतात.
कोन - पुरककोन C P A B Q R ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते अशा कोनांना परस्परांचे पुरककोन असे म्हणतात.
कोन - संगतकोन A P Q R ज्या दोन कोनांमध्ये एक भुजा सामाईक असते, परंतु, ज्यांचे क्षेत्र सामाईक नसते अशा कोनांना परस्परांचे संगतकोन म्हणतात. आकृतीमध्ये AQP व PQR हे परस्परांचे संगतकोन आहेत.
कोन - रेषीय जोडीतील कोन P A Q R जेव्हा दोन संगतकोन एकमेकांचे पुरककोनही असतात तेव्हा त्यांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. आकृतीमध्ये AQP व PQR हे रेषीय जोडीतील कोन आहेत.