प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।

ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे मी तो हमाल (आप्पा कोरपे)

इसी तरह की प्रस्तुतियाँ


विषय पर प्रस्तुति: "ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे मी तो हमाल (आप्पा कोरपे)"— प्रस्तुति प्रतिलेख:

1 ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे मी तो हमाल (आप्पा कोरपे)
द्वितीय वर्ष कला (सत्र ४) विषय : आत्मकथन (अभ्यासपत्रिका II) मी तो हमाल (आप्पा कोरपे) घटक : तीन प्रा. प्रज्ञा दया पवार

2 ‘मी तो हमाल’

3 आत्मकथनाविषयी ‘‘मी तो हमाल’’ हे आप्पा कोरपे यांचे आत्मचरित्र होय. कोरपेंना खरं तर लिहिता वाचता येत नाही. भाषा आणि निवेदन या अंगाने आपण ‘ ‘मी तो हमाल’’ची पाहणी केली तर ‘लिहिता वाचता न येणारा’ असे त्यांचे वर्णन करताच येत नाही. त्यांच्या स्वतःच्याच भाषेत सांगायचं झालं तर ‘वाणीबहाद्दर’! या वाणीबहाद्दराने आपली ही जीवनकहाणी टेप केली आणि त्याने सांगितलेल्या भाषेतच अश्‍विनी कावळे यांनी मोठ्या जिद्दीने ती वाचकांसमोर आणली. पेशाने हमाल असणार्‍या कोरपे आपले चरित्र म्हणजे आपले जीवन चार टप्प्यात उलगडून दाखविले आहे. या प्रत्येक टप्प्याला कोरपे यांनी ‘पेणे पहिले’, ‘पेणे दुसरे’ अशी शीर्षके दिली आहेत. ‘पेणे’ म्हणजे प्रवासातील मुक्कामाची जागा होय.

4 ‘मी तो हमाल’ – आशयसूत्रे
कुटुंबाच्या वाताहतीची कहाणी :- ‘‘‘मी तो हमाल’’ ही जशी हमालांच्या व्यथा वेदनांची कहाणी आहे, तशी ती आप्पा कोरपे यांच्या कुटुंबाच्या वाताहतीचीही कहाणी आहे. पाच माणसांचे हे कुटुंब. घरात अठरा विश्‍वे दारिद्र्य. भुकेपायी ही पाच माणसं पाच ठिकाणी विखुरली जातात. एकट्या आप्पांचा अपवाद सोडला तर या कुटुंबातील उरलेल्या चारी माणसांना भुकेने आणि दारिद्र्याने मृत्यूच्या जवळ ओढून नेले आहे. भूक - दारिद्र्याचे जिणे :- आप्पा कोरपे यांचे वडील गहिनीनाथ हे जन्मजात दारिद्र्याचा वारसा घेऊन जन्माला आले. जमिनीला पाणी नाही. एकटा बाप कर्ता, बाकी नुसती खाणारी तोंडे, कधी हुलगे पिकायचे नाहीत, चिंचा खायच्या, आंबे खायचे, सीताफळ खायचे, असे दिवस काढीत गहिनीनाथाने पस्तिशी गाठली. पोट भरायची मारामार तिथे लग्नाचा विचार कसा करणार?

5 व्यक्तिरेखा – शेवंताबाई
आप्पा कोरपे यांच्या मातोश्री म्हणजेच शेवंताबाई होत. शेवंताबाई अत्यंत गरीब घरात जन्माला आली. शाळेचे तोंडही पाहिले नाही. खरे तर त्या काळात स्त्रीशिक्षणाची सुरुवात झाली होती. पण ग्रामीण व आर्थिक मागासलेल्या कुटुंबांमध्ये स्त्रियांना शिक्षणासाठी पाठवले जात नसे. आई-वडील लहानपणीच गेल्यामुळे शेवंताबाई उघड्यावर पडली. गरीबीमुळे लग्न जमेना म्हणून तिच्या थोरल्या भावाने साटंलोटं करून वयाने खूपच मोठ्या असलेल्या नवर्‍याच्या गळ्यात तिला बांधलं. जीवनातील हालअपेष्टांचे खापर तिने नवर्‍याच्या माथी फोडण्याचा प्रयत्न केला. ती स्वतः कामाला कधी गेलीच नाही. शेवटपर्यंत नवर्‍याला छळत राहिली. त्याचा अपमान करत राहिली. केवळ भाकरीसाठी तिने दुसरा नवरा केला. पण त्यातही तिला अपयश आले. ‘व्यभिचारी’ हा कायमचा शिक्का बसला. त्यामुळे ती पुरेपूर खचून गेली.

6 ‘स्व’ची व्यक्तिरेखा ‘‘मी तो हमाल’’ हे आप्पा कोरपे यांचे आत्मकथन आहे. त्यातून त्यांची कौटुंबिक परिस्थिती वाचकांसमोर उभी राहाते. या आत्मचरित्रात कोरपे यांच्या अगोदरपासून म्हणजे आई-वडिलांपासूनचा भाग येतो. आप्पा कोरपे जीवनातील सर्व प्रसंगांना धीराने सामोरे जातात. सहृदयतेने दुसर्‍यांना समजून घेतात. आयुष्याकडून स्वतः शिकत जातात आणि इतरांनाही शहाणे करीत जातात. विशेषतः ते ज्या हमाल कामगारांची संघटना उभी करीत आहेत तो वर्ग आजही अशिक्षित, अडाणी, अंधश्रद्धाळू आहे. पण आप्पा क्षणार्धात त्यांच्याशी सुसंवाद साधतात. तो त्यांना कामगारांबद्दल असलेल्या प्रेमापोटी. ते स्वतःला गमतीने वाणीबहाद्दर म्हणत असले तरी ते कृतिबहाद्दरही आहेत, हे दुर्लक्षून चालणार नाही.

7 ‘मी तो हमाल’ – निवेदनशैली
स्वानुभूतीतून लेखन :- आप्पा कोरपे हे मूळ लेखक नाहीत. फारसे शिकलेले नाहीत. कलेच्या वा साहित्यिकांच्या अवतीभवतीच्या वातावरणात वावरलेले नाहीत. त्यांना जन्मापासून मिळालेली अनुभवांची शिदोरी, संस्कार एवढेच त्यांच्यापाशी आहेत. प्रामाणिकपणे नेटाने काम करण्याची वृत्ती आहे. त्यांचे हेच संस्कार, काम करण्याची वृत्ती, समाजातील वावर त्यांचे लेखन उच्च दर्जाचे करतात. आप्पांनी शक्यतो ते निवेदन ज्या प्रकारे करतात त्यानुसार अक्षरबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर भाषा विनिमय साधनांची ही अडचण आहे. मौखिक परंपरेतील निवेदन आपला अनुभव, उच्चार, संगीत, नाट्य, अभिनयादी अंगांनी डोळ्यांसमोर उभा करतो तसे लिखित संहिता साधनांद्वारे घडत नाही. आप्पांची भाषा ग्रांथिक नाही. ती जामखेड, नगर, सोलापूरच्या सरहद्दीतील लिंगायत वाणी लोकांची भाषा आहे.

8 ‘मी तो हमाल’ – निवेदनशैली
कथनातील तटस्थता :- आप्पा कोरपे यांच्या प्रसंगवर्णनाचे वैशिष्ट्य हे की ते करताना ते त्याच्याशी समरस होतात, पण त्याच क्षणी तटस्थ बनून त्यावर ते भाष्यही करतात. त्यांची ही अलिप्तता त्यांचे चिंतनशील व्यक्तिमत्त्व स्पष्ट करते. मिश्किलतेची झाक :- कधी कधी मात्र कोरपे गांभीर्याची ही आवरणे बाजूला सारून मुक्तपणे प्रसंग वर्णने करतात. त्यांच्या स्वतःच्या लग्नाचा प्रसंग असाच आहे. नगरच्या एस.टी. स्टँडवर गारुड्याबरोबर कोरपे यांची रंगलेली जुगलबंदी हा प्रसंग त्यांनी विनोदाची डूब देऊन रंगविला आहे. सरळ, सोपी, साधी भाषा :- कोरपे यांच्या निवेदनाचा बाज लोककथाकाराचा आहे. आपल्या श्रोत्यांची, वाचकांची उत्सुकता कायम ठेवून, ते निवेदन चढवीत नेतात. छोट्याछोट्या वाक्यांनी आपला अनुभव गोचर करतात.

9 स्वाध्याय ‘जसं घडलं तसं’ या आत्मकथनातून अभिव्यक्त होणारे अनुभवविश्व सविस्तर लिहा. टिपा लिहा. १) ‘जसं घडलं तसं’ या आत्मकथनाच्या शीर्षकाची समर्पकता २) ‘जसं घडलं तसं’मधील जैन समाज ३) ‘जसं घडलं तसं’मधील राघोबा पाटलाचा वाडा ४) ‘जसं घडलं तसं’ची भाषाशैली व संवादाचे स्वरूप

10 आणि स्वाध्याय पूर्ण व्हावा म्हणून
धन्यवाद…!! आणि स्वाध्याय पूर्ण व्हावा म्हणून शुभेच्छा...!!


डाउनलोड ppt "ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे मी तो हमाल (आप्पा कोरपे)"

इसी तरह की प्रस्तुतियाँ


गूगल के विज्ञापन