डाउनलोड प्रस्तुति
प्रस्तुति लोड हो रही है। कृपया प्रतीक्षा करें।
1
SUSTAINABLE DEVELOPMENT
Rayat Shikshan Sanstha`s Chhatrapati Shivaji College, Satara Department of Economics SUSTAINABLE DEVELOPMENT (शाश्वत विकास) Dr. S.M. Bhosale
2
CONCEPT OF SUSTAINABLE DEVELOPMENT (शाश्वत विकास)
१९८७ मध्ये पर्यावरणव विकास यावरील जागतिक (ब्रूटलंड)समितीने प्रथमच शाश्वत विकास ( चिरकाल टिकणारा विकास )हि संकल्पना वापरली सन १९९९-२००० मधील जागतिक विकास अहवालात यावर अधिक भर देण्यात आला. हि संकल्पना पर्यावरणाच्या संबंधात ओळखली जाते त्यामुळे पर्यावरण अर्थशास्त्र हि नवीन कल्पना निर्माण झाली आहे शाश्वतविकासहिसंकल्पनादीर्घकालीन,भविष्याभिमुख ,बळकट व फलदायी विकास असून ज्याचा संबंध चालू व भावी पिढ्याशी जोडला जातो
3
Meaning of sustainable development
शाश्वत विकासाच्या संकल्पनेला व्यापक खोली आहे शाश्वत विकास म्हणजे भविष्यकालीन विकासच्या गरजेच्या संबंधितासह सध्याचा विकास मानला जातो साधनसामुग्रीच्या पिळवणूकीने भविष्यकालीन पिढीसाठी अनेक समस्या निर्माण केल्या जातात म्हणून हि संकल्पना साधनसामुग्रीच्या शाश्वत वापरावर जोर देते की ज्यामध्ये भविष्यकालीन पिढ्याच्या गरजा पूर्ण करता येतील हि संकल्पना एका बाजूला विकासासी तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणाशी जोडलेली आहे म्हणून हि संकल्पना पर्यावरण अर्थशात्रात अत्यंत महत्त्वाची आहे
4
Defination of sustainnable development
१) ब्रूटलंड अहवाल-”भावी काळातील पिढ्यांच्या गरजांची तडजोड न करता वर्तमान पिढ्याच्या गरजा पूर्ण करणे म्हणजे शाश्वत विकास होय”(Sustainable development is development that meets the needs of the present without compromising the ability of future generation it meet their own needs-brutland report) २)रॉबर्ट अलेन- मानवी गरजांचे चिरकाल टिकणारे समाधान आणि मानवी जीवनाच्या दर्जात सुधारणा साध्य करणे म्हणजे शाश्वत विकास होय (sustainable development that is likely to achieve lasting satisfaction of human need and improvement of the quality of human life-Robert Allen)
5
मानवीं विकास अहवालात शाश्वत विकासात आर्थिक वृद्धीची संकल्पना अभिप्रेत आहे
हि संकल्पना विशिष्ट व्यवसायापुरतीच मर्यादित न ठेवता सर्वच व्यवसायासाठी लागू केली आहे. यात पर्यावरणाला हानी न पोहचता विकास घडवून आणण्याला महत्त्वाचे स्थान दिले आहे उदा.जलसिंचनासाठी व चौपदरी रस्ते विकासाठी मोठी जंगलतोड करावी लागली तरी त्या परिसरात नवीन वृशांची लागवड मोठया प्रमाणात करणे अपेक्षित आहे. अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी जमिनीचे सपाटीकरण करताना सामाजिक वनीकरणाचे किवा
6
फलोद्योन विकासाचे उपक्रम हाती घेवून वनराई वाढविणे अपेक्षित आहे.
उद्योगांच्या वाढीमुळे हवेचे प्रदुषण होत असेल तर ते नियंत्रित करण्यासाठी प्रवर्तकांनी उपाययोजनांची अमलबजावणी करणे अपेक्षित आहे.त्यांच्यावर कार्बन कर,दाटी कर,यासारखे करबसविणेयोग्य ठरते पाण्याच्या अतिरिक्त वापराने जमीन क्षारपड बनते, रासायनिक खते,कीटकनाशकांचा वापर,टाकाऊ पदार्थामुळे जलप्रदुषण होते. इंधनाच्या मोठ्या प्रमाणातील वापरामुळे,नागरीकरण व उदयोगीकरणामुळे,वातावरणाची अवंनती होते.
7
शुद्ध हवा दुर्मिळ होत आहे त्यामुळे त्याचे सजीव सृष्टीवर अनिष्ठ परिणाम होतील
खनिजांच्या अतिवापराचा भविष्यकालीन विकासावर व पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होईल,या सर्वासाठी त्याविरोधी उपाययोजना करणे अपेक्षित आहे. शाश्वत विकासाची संकल्पना भविष्यकालीन भविष्याभिमुख बळकट फलदायी असून चालू व भावी पिढ्यांच्या हितासी तिचा संबंध जोडला जातो. यात नैसर्गिक साधनसामग्रीची अतिरिक्त पिळवणूक होता काम नये.
8
थोडक्यात,शाश्वतविकासहाआर्थिक,उत्पादक,रचनात्म क,दीर्घकालीन,बदलाची प्रक्रियाअसून त्यामध्ये निसर्गातीलबदलांचेप्रकार,गुंतवणूकीचीपद्धती,तंत्रज्ञान यातीलअसूनतेसातत्यानेवर्तमानकाळवभविष्यकाळात घडत असते शाश्वत विकासाचे दर्शक/घटक: १)स्थूल उत्पादन वृद्धीचा दर: हा शाश्वत विकासाची महत्त्वाचा दर्शक आहे.स्थूल देशांतर्गत विकासाची हि मुख्य कसोटी असते. हा दर वस्तू व सेवांच्या एकूण उत्पादन वृद्धीदरावर अवलंबून असतो.
9
हा दर भांडवलनिर्मिती,भांडवलाची सीमांत कार्यक्षमता,मुलभूत सुविधा,साधनसामुर्गीच्या वापराचे नियोजन इ.वर अवलंबून असते व उद्याच्या पिढ्याच्या कल्याणासाठीउच्च आर्थिक वृद्धीदर आवश्यक असतो. २)पर्याप्त लोकसंख्या: अतिरिक्त लोकसंख्या भावी पिढ्यासाठी हानिकारक ठरते चालू व भावीपिढीच्याकल्याणासाठी,साधनसामुग्रीच्या पर्याप्त वापरासाठी लोकसंख्या पर्याप्त असावी त्यामुळे लोकसंख्या नियत्रंणाची गरज आहे. ३)पाणीपुरवठा व त्याचा योग्य वापर:
10
पाणीपुरवठा व त्याचा योग्य वापर शाश्वततेसाठी प्रत्यक्ष जोडले जाते
पाणी हा उत्पादक व उपभोगाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे शुद्ध व सुरक्षित पाणी जीवनाच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे.त्याची टंचाई आहे. पाण्याचा अतिरिक्त वापर व अकार्यक्षम वापरणे पाण्यासाठी तंटे निर्माण होत आहेत. ४)स्वच्छ व शुद्ध हवा: स्वच्छव शुद्ध हवा भावी पिढ्यासाठी उलब्ध होणे हे शाश्वततेचे दर्शक आहे. स्वच्छ हवा मानवप्राणी व प्राणीमात्राना जिवंत राहण्याचा आधार देते.अनेक क्षेत्रात दुषित हवा आढळते ती मानवी आरोग्यासाठी हानिकारक असते याने विकास प्रक्रियेची शाश्वतता दूर होते.
11
५)मानवी साधनसंपत्ती : मानवी साधनसंपत्तीचा वापर आर्थिक विकासाठी आवश्यक असतो.
मानवाचा वापर मानवी भांडवल म्हणून केला जातो मानवी दर्जा विकास प्रक्रियेत गरजेचा असतो.शिक्षण,प्रशिक्षण,पोस्टीक अन्न,संसोधन राहणीमानाचा दर्जा इ.मानवी विकासाचेदर्शक आहेत. ६)उर्जा : उर्जा हा विकास प्रक्रियेचा मुख्य घटक असून शाश्वत विकासावर उर्जेच्या मागणी- पुरवठ्याच्या बदलांचा विशेस परिणाम होतो. उर्जा सधनता एकूण उत्पादनात अतिशय महत्त्वाची असते
12
७)भौतिक साधनसामुग्री: सामग्रीची भौतिकसधनता शाश्वततेसाठी महत्त्वाचा घटक आहे.साधने पर्यायी उपयोगाची असल्याने त्यांची टंचाई अधिक भासते त्यामुळे साधनसामुग्रीचे नियोजन व वाटप,सामग्री संयोगीकरण,वापर,तंत्रज्ञान इ.महत्त्वाचे असते. ९)विविध मुलभूत सामग्री: विविध मुलभूत सामग्री विविध क्षेत्रासाठी उत्पादन सधनता शाश्वततेसाठी आवश्यक आहे. सामग्री पुन्हा उपयोगात आणण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया महत्त्वाची असते १०)तापमानातवाढ,माती व खनिजसंपत्ती : खनिजसंपत्ती हे आर्थिक विकासाचे महत्त्वाचे घटक आहेत.त्याचा अतिवापर व अतिह्व्यास भावीपिढ्यासाठी हानिकारक ठरतो.हवेतील तापमानवाढ हि शाश्वत विकासाठी मार्क असते.
13
सारांश:शाश्वत विकासात मानवीविकास निर्देशांकला महत्त्वाचे स्थान असते
सारांश:शाश्वत विकासात मानवीविकास निर्देशांकला महत्त्वाचे स्थान असते.त्यामध्ये दीर्घ व निरोगी आयुष्य,ज्ञानसंपादन करणे आणि राहणीमानाचा उच्च दर्जा प्राप्त करणे या गोष्टी अभिप्रेतअसतात. यात मानवी स्वाभिमान,हक्क,राजकीय व सामाजिक व सांकृतिक प्रगती अभिप्रेत असते.
इसी तरह की प्रस्तुतियाँ
© 2025 SlidePlayer.in Inc.
All rights reserved.